चौवार्षिक (वर्ष १ले)

प्रत्येक वर्षी प्रगत पावलांनी अधिक सूक्ष्मतेकडे आणि भव्यतेकडे नेणारा हा फक्त मनशक्तीच्या साधकांसाठीचा उपक्रम आहे. दर वर्षी एक महिना याप्रमाणे चार वर्ष हा वर्ग घेतला जातो.

या चार वर्षांत एका योजनाबद्ध प्रक्रियेने साधकांच्यातले उत्तमत्व उमलण्याची एक विलक्षण प्रक्रिया होते.
पहिले वर्ष; मननिश्चितीसाठी,
दुसरे वर्ष; मन व व्यवसाय यांचा शरीरावर होणारा परिणाम पाहाण्यासाठी,
तिसरे वर्ष; ज्याची त्याने शरीराची ओळख करून घेण्यासाठी आणि
चौथे वर्ष; या सर्व अभ्यासाचा समन्वय करून जीवन सुख-निश्चितीचा आराखडा कायम करण्यासाठी चौथे
वर्ष. असा हा एकूण चार वर्षांचा कार्यक्रम.

हा वर्ग करत असताना आलेखामुळे आत्मचिंतन होईल. अभ्यासामुळे बौद्धिक स्पष्टता होतील. वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर होणार्याु चर्चेमुळे, अभ्यासामुळे अडचणींची देवघेव होईल. एकाग्रतेमुळे आंतरशक्ती समर्थ होईल आणि बाह्य जगात सत्ची जोड दिल्यामुळे धैर्य व पुण्य वाढेल.

चौवार्षिक वर्गाची चार वर्षे पूर्ण झाल्यावर पुढे तीन वर्षे त्या त्या महिन्यांत आवर्तन वर्ग असेल.

मन म्हणजे काय?; मनाची इच्छा, मन आणि शरीराचे परस्परसंबंध, द्वैत-अद्वैत संकल्पना यांच्या मूलभूत अभ्यासाच्या माध्यमातून, स्वत:मधले दोष कसे जाणावेत, त्यात योग्य बदल कसा करावा याचे मार्गदर्शन या वर्गात आहे. मन आणि मेंदू यामध्ये योग्य बदल घडवून, सुखी आणि शांत जीवनासाठीचे उपाय या अभ्यासातून मिळतात. मेंदूशास्त्रातील आधुनिक संकल्पना आणि पूर्वाचार्यांनी सांगितलेल्या परा - पश्यंती - मध्यमा - वैखरी या संकल्पना शिकून, प्रत्यक्षात आपल्या व्यावहारिक अडचणी सोडविण्याचा मार्ग या वर्गात मिळतो.

देणगीमूल्य : १ व्यक्ती - रु. १०८०/-
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसठी आहे.

चौवार्षिक (वर्ष १ले)
चौवार्षिक (वर्ष १ले)

Videos to be uploaded shortly.

The schedule for next 3 months only is shown here. For yearly schedule kindly see Events Calender. OR contact Main Centre OR Local Centre.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView