पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात, मनशक्तीचे नवीन माहिती केंद्र सुरु!

New Pune Centre - ABC 2
New Pune Centre - ABC 1

पुण्याच्या सुप्रसिद्ध अप्पा बळवंत चौकात, प्रभात टॉकीजजवळ, मनशक्तीचे नवीन माहिती केंद्र सुरु झाले आहे. शुक्रवार दि. २७ जानेवारी २०१२ रोजी, संध्या. ५.३० वा., मा. श्री. मल्हार अरणकल्ले (संपादक, साप्ताहिक सकाळ, पुणे) यांच्या शुभहस्ते सदर माहिती केंद्राचे उद्घाटन झाले! (नेमका पत्ता खाली पहा). श्री. ज्ञानेश्वर फडतरे (पोलीस उपायुक्त, पुणे) तसेच पुण्यातील अनेक मान्यवरही या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित होते. संध्या. ५.३० ते ८.३० यावेळात सुमारे अडीचशे लोकांनी या केंद्राला भेट दिली.

श्री. मल्हार अरणकल्ले यांनी दीप-प्रज्वलनाने नवीन माहिती केंद्राचे उद्घाटन करुन, पुढील शब्दात आपले मनोगत व्यक्त केले, ‘‘मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्याशी सुमारे चाळीस वर्षांपूर्वीपासून माझा संपर्क आला. त्यांच्या लेखांचे वाचन, तेव्हापासून मी केले आहे. अतिशय बुद्धिनिष्ठ विचार करणार्‌या स्वामीजींनी, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सुरेख सांगड व्यवहाराशी घातली. समाजात, सर्वसामान्य माणसाला जमेल असे समाजसेवेचे व्रत घेण्याची प्रेरणा त्यांनी दिली. मनशक्तीच्या सत्कृत्य-संकल्पाच्या विचार आणि आचाराने, समाजात, छोट्या स्वरूपाचे सकारात्मक बदल घडत आहेत तसेच ते होत राहातीलही. मनशक्तीच्या या नवीन माहिती केंद्राला माझ्या मनापासून शुभेच्छा!!’’

सदर केंद्रात आपल्याला मनशक्ती केंद्राचे -

  • स्वरुप व कार्याची माहिती मिळेल;
  • अभ्यासवर्ग, कार्यशाळा, यंत्रचाचणी, पूजा इ. उपक्रमांची नावनोंद करता येईल;
  • मासिक पाठ व दिवाळी अंकाची वर्गणी भरता येईल;
  • ग्रंथ व प्रयोगात्मक साहित्य, आयुर्वेदीय उत्पादने, सीडीज्‌ पाहाता व खरेदी करता येईल इ.

समाजसेवेचा वसा घेतलेली लोणावळ्याची मनशक्ती प्रयोगकेंद्र ही संस्था, गेली सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राला सुपरिचित आहे.

‘समाजसेवेसाठी, रोज किमान एक तास नि:स्वार्थीपणे द्या’, असा सर्वकल्याणाचा मंत्र देणारे आदरणीय स्वामी विज्ञानानंद, हे मनशक्ती प्रयोगकेंद्राचे संस्थापक वा प्रथम चिंतक. मनशक्तीच्या गर्भसंस्कारापासून ते अनेक प्रकारची शिबिरे, अभ्यासवर्ग, यंत्रचाचण्या, कार्यशाळा, पूजा इ.चा लाभ, आतापर्यंत लाखो लोकांनी घेतला आहे. मनशक्तीची, महाराष्ट्रभर सुमारे पन्नाहून अधिक उपकेंद्र आणि स्थानिक केंद्रे आहेत, व सुमारे सात हजाराहून अधिक साधक कार्यकर्ते आहेत.

पुण्याच्या पेरुगेट भावे हायस्कूलजवळ मनशक्तीचे एक माहिती केंद्र कार्यरत आहेच; तसेच, पुण्याच्या रेल्वे प्लॅटङ्गॉर्म क्र. १ वरही मनशक्तीचा ग्रंथ स्टॉल आहे. तथापि, पुण्यनगरीमधील मनशक्तीचे दिवसेदिवस वाढते कार्य लक्षात घेऊन, मनशक्तीने आणखी एक माहिती केंद्र, पुण्याच्या सुप्रसिद्ध अप्पा बळवंत चौकात, प्रभात टॉकीजजवळ सुरू केले आहे. पुणेकर तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांनी अवश्य त्याचा लाभ घ्यावा!

केंद्राचा पत्ता व संपर्क
मनशक्ती माहिती केंद्र,
६८६, शिवगंगा चेंबर्स, तळमजला,
बाजीराव रोड, प्रभात टॉकिजजवळ , पुणे.
संपर्क : ९८२२४०४७०२, ९८५००८२६८५)

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView