मनशक्तीच्या अभिनव कृषि यज्ञात, ६० शेतकरी सहभागी!!

Krishi Yajna-1

मनशक्ती प्रयोगकेंद्र आयोजित कृषि यज्ञ, दि. १४ जानेवारी २०१२ रोजी चाकण येथे संपन्न झाला. सुमारे साठ शेतकर्‌यांनी यात सहभाग घेतला. शेती समृद्धीसाठी प्रार्थना प्रयोगाची माहिती यामध्ये देण्यात आली. तसेच सर्वांना यज्ञात हवन करण्याची संधी मिळाली. मनशक्ती शेती प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या शेतकर्यांचनी या प्रसंगी आपले अनुभव सांगितले. या प्रयोगाची माहिती देणारा लघुपट (डॉक्युमेंटरी) दाखविण्यात आली. अन्नधान्य उत्पन्नाचे महत्व सांगून शेतकर्यां नी शेती करणे सोडू नये, असे आवाहन करण्यात आले.

जीवनातील यशाचे रहस्य सांगणारी आधुनिक आणि वैज्ञानिक यज्ञ संकल्पना पू.स्वामी विज्ञानानंद यांनी समाजात रुजवली. यज्ञ ही निसर्ग नियम शिकवणारी प्रक्रिया आहे. य म्हणजे निर्मिती आणि ज्ञ म्हणजे ज्ञान. निर्मितीचे ज्ञान म्हणजे यज्ञ. निसर्गात निर्मिती कशी होते? कोणतीही वस्तू किंवा उजार्र् नव्याने निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. एका पदार्थाचे किंवा उर्जेचे रुपांतर दुसर्यार पदार्थात किंवा उर्जेत होते. याचा अर्थ काहीतरी निर्माण होते तेव्हा काहीतरी नष्ट होत असते. त्याच न्यायाने माझ्या आयुष्यात यशाची, सुखाची निर्मिती घडवून आणायची असेल तर माझ्याकडे असलेल्या काही गोष्टींचा मी त्याग करायला हवा. यज्ञाकडे आपली इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना करत असतानाच इतराच्या सुखासाठी मी माझ्या शक्तींचा उपयोग करीन हा निश्चवय झाला पाहिजे. समाजातील लोकांनी यज्ञाच्या निमित्ताने एकत्र यावे. स्वत:च्या यशाबरोबर समाजाच्या प्रगतीचा विचार करावा. एकमेकांच्या गरजा समजावून घेऊन त्या पूर्ण करण्याचे सामाजिक प्रयत्न करावेत. समाजातील विषमता नष्ट करुन समता प्रस्थापित करणे हा यज्ञाचा मुख्य उद्देश आहे. समता हा निसर्ग नियमही आहे. समता निर्माण व्हावी यासाठी दुर्बल घटकांचे जीवन उंच करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

कृषियज्ञामध्ये शेतकर्यां नी आपल्या शेती समृद्धीसाठी एकत्र यावे. सहकार्यवृत्तीने स्वत:ची आणि सर्वांची प्रगती साधावी. यानिमित्ताने शेती विषयक माहिती जाणून घ्यावी. नव्या पिढीला शेतीची आवड निर्माण व्हावी, आर्थिक विकास व्हावा, जीवनमान घडावे या अनेक उद्देशांनी कृषियज्ञात ज्ञानसत्र आयोजित केली जातात.

चाकण येथील मनशक्ती केंद्रात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दु. ३ ते ५ या वेळात ही ज्ञानसत्र होणार आहेत. कोणीही शेतकरी यामध्ये सहभागी होऊ शकतात. सहभागासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView