'I' for Idea कार्यक्रमात, ५०० युवक सहभागी!

31st Dec-1

'I' for Idea या संकल्पनेवर आधारित ‘विधायक ३१ डिसेंबर’ हा युवकांसाठीचा कार्यक्रम खूपच चांगला झाला! ‘३१ डिसेंबर’ हा दिवस, विधायक पध्दतीने साजरा करायचा, या मनशक्तीच्या संकल्पनेला, दरवर्षी, युवकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. ह्यावर्षी महाराष्ट्रातून सुमारे ५०० युवक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यंदाचं हे आठवं वर्ष आहे.

मनशांती आश्रमाच्या निसर्गरम्य परिसरात, सं. ७ वा, स्फुर्तीदायक ‘गेम शो’ला सुरुवात झाली. आलेल्या युवकांनी उत्साहाने गेम शोमध्ये भाग घेतला.

स्नेह-भोजनानंतर भव्य ‘स्टेज शो’चे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ३ तासांचा ‘स्टेज शो’, मनशक्तीच्या १०० युवा साधकांनी अप्रतिमपणे सादर केला. 'I' for Idea या थीम अंतर्गत, विविध स्किट्सच्या (छोटी नाटकं) माध्यमातून, विविध संकल्पना प्रभावी पध्दतीने युवकांसमोर मांडल्या गेल्या.

  • विचित्र, अशक्य वाटणार्‌या कल्पना प्रत्यक्षात येतात;
  • अपयश हा कल्पनाशक्तीचा, यशाचा उर्जास्त्रोत आहे;
  • ङॉ. रघुनाथ माशेलकरांचा हळदीचा पेटंट मिळवण्याचा लढा;
  • कल्पना साकार करण्याच्या सात पायर्‌या; आणि
  • समाज बदलण्याची Idea म्हणजे, मुळात मी स्वत: पहिले बदललं पाहिजे.

अशा विविध संकल्पनांवर स्कीट्स बसविण्यात आल्या होत्या. नृत्य, नाट्य, मानवी मनोरे, मान्यवरांचे संदेश ह्यांनी कार्यक्रम रंजक व बोधक झाला! (फोटो येथे पहा.)
.
मॅगसेसे पुरस्कार विजेत्या श्रीम. निलिमा मिश्रा, भारतीय नेमबाज श्रीम. तेजस्वीनी सावंत, आंतर्‌राष्ट्रीय सल्लागार श्री. संदीप वासलेकर, व यंग इन्होव्हेटर कु. अंकिता नगरकर ह्या मान्यवरांच्या संदेशांचा त्यात समावेश होता.

रात्री १२ च्या ठोक्याला नववर्षाचे स्वागत करण्यात आले! प्रकाशाच्या साक्षीने आंतर्बाह्य वर्तनशुद्धी व राष्ट्रकल्याणाचा `संकल्प' (खाली पहा), उपस्थित युवकांनी केला.

कल्पनाशक्तीचं सामर्थ्य व तिचा वापर करुन आपण कशी प्रगती साधू शकतो हे दर्शवणारे काही इन्होव्हेटीव्ह व्हिडियोज् युवकांना दाखवले गेले.

आलेल्या युवकांनी कार्यक्रम मनापासून आवडल्याची जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली व चांगल्या प्रेरणा घेऊन पुन्हा येण्याची इच्छा दर्शवली!

प्रतिज्ञा
आज आम्ही निश्चेय करतो की -

  • कल्पनाशक्तीचा वापर करून आम्ही विधायक काम करू!
  • सकारात्मक वृत्ती ठेवून, निराशेवर मात करून, अपयशाची भीती सोडून, सत्कार्यासाठी झटू!
  • अपमान आणि नकाराने खचून न जाता, कार्याची जिद्द वाढवू!
  • अहंकार आणि खोटा अभिमान विसरून नम्रतेने वागू!
  • मोठ्यांचा आदर, सहकार्यांरचे संघटन आणि लहानांची प्रगती करू!
  • अनैतिकता, व्यसन, असत्य यात सुख मानणार नाही; चांगुलपणाचा खोटा आव आम्ही आणणार नाही; व्यक्तिमत्वात आंतर्बाह्य पारदर्शकता ठेवू!
  • उत्कृष्टत्वाचा ध्यास बाळगून, कठोर परिश्रमाने ते साध्य करू!
  • स्वत:बरोबरच राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू!

समाजाला सुखी, समृध्द करण्यातच आमचं यश सामावलं आहे! हे मातृभूमी आमच्या या संकल्पांना यश दे!

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView