तत्वफुले (भाग १)

Rs.55.00
तत्वफुले (भाग १)

तत्वफुले भाग - १
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- १२०
देणगीमूल्य:- रु. ५५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘तत्वफुले’ या स्वामी विज्ञानानंद यांच्या ग्रंथातील तत्त्वफुलांची ओंजळ तुम्हाला अनेकविध रसगंधांनी अन् जीवनातील अनेकविध रंगांनी, निश्चित मोहित करील, अंतर्मुख करील.

स्वामी विज्ञानानंद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या अनेक तत्वलेखांचा संग्रह या ग्रंथात आहे. जीवनातील अनेकविध विषयांवर केलेले विचारमंथन सदर ग्रंथात आहे.

समतेचा न्याय, कार्यकारण तत्त्व, सुख-दु:ख मि मांसा, रेझोनान्स तत्त्व, विश्वाचे नियम, निर्वाण कल्पना, भक्ती, ज्ञान, श्रद्धा यांच्या संकल्पना, शांतीचे सामर्थ्य, एकीचे बळ, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र अशा विविध विषयांवर स्वामीजींनी सोप्या, नेटक्या शब्दात आपले विचार मांडलेले आहेत.

फक्त वाचनानेच आपणास आनंदीत करणारा ग्रंथ आहे, असे नाही, तर वाचून चिंतन, वर्तन केले तर आपल्या जीवनाला निश्चितच कलाटणी मिळेल. अनेक प्रश्नांची उकल होईल, अडचणींचे डोंगर पार करण्यात सुसह्यता येईल. तसेच भविष्य उज्वल झाल्यावाचून रहाणार नाही. एक वेगळाच आनंद आपल्या मनाला हा ग्रंथ मोहरुन टाकील.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView