ध्यान पाठ (भाग २)

Rs.110.00
ध्यान पाठ (भाग २)

ध्यानपाठ (भाग२)
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:-२०८
देणगीमूल्य:- रु. ११०/- कुरियर चार्जेस अधिकीचे

ध्यान का व कसे करायचे?

'ध्यान' म्हटले, की साहजिकच आपल्या डोळ्यांपुढे प्रश्न उभे राहतात. ध्यान कशाला करायचे, कशासाठी करायचे, कसे करायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे या ध्यान पाठांमध्ये, स्वामी विज्ञानानंद यांनी दिली आहेत.
ध्यान अवघड किंवा गूढ आहे असे कित्येकांना वाटते, पण तसे ते नाही. खरी अडचण आहे ती आपले चंचल मन स्थिर करणे. वरवर जरी आपण स्थिर, शांतचित्त वाटत असलो, तरी अंतर्यामी अशांतच असतो. ध्यान हे प्रत्येकालाच आवश्यक आहे. ध्यानाचा पुरस्कार फक्त भारतच करीत नाही, तर तिबेट, चीन, जपान आदि देशही करीत आलेले आहेत व करीत आहेत. आशियाई देशच नव्हे, तर युरोप व अमेरिका खंडातही ध्यानाबाबत औत्सुक्य दाखवले जाते, व अमलातही आणले जाते.

ध्यानामुळे वृत्ती स्थिर होते. मनाची एकाग्रता वाढते, शक्ती वाढते. आरोग्य चांगले राखले जाते. ध्यानामुळे वाचलेल्या शक्तीचा व्यवहारात इतर क्षेत्रातही चांगला उपयोग होऊ शकतो. मग ते शिक्षण असो, खेळ असो, व्यवहार असो की अन्य कोणतेही क्षेत्र असो. अर्थात हा अनुभव प्रत्येकाने स्वत:च घ्यायचा असतो. त्यासाठी काय करायचे, ध्यान कसे करायचे या सर्वाची वैचारिक व तात्विक चर्चा ध्यानपाठ १ व २ या दोन्ही ग्रंथात केली आहे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView