Home » कॅटलॉग पहा
कॅटलॉग पहा
|
अनेक वर्षांच्या संशोधनातून साकारलेले माणसाच्या सुखाचे गणित म्हणजे ‘न्यू वे’चे अभ्यासवर्ग. माणसांच्या संकटांवर उपाय सुचविणारे, संकटे येऊ नयेत म्हणून कसे वागावे हे सांगणारे. पदार्थ-विज्ञानशास्त्र, गणित, तर्कशास्त्र या विज्ञानत्रयींच्या आधारे मांडलेले सिद्धान्त हे प्रत्येक वर्गाचे खास वैशिष्ट्य.
|
मनशक्तीतर्फे, समाजातील शहरी आणि ग्रामीण परिसरात, वेगवेगळ्या वयोगटांसाठी, विविध विषयांवर एक दिवसीय कार्यशाळा, दृक्श्राव्य पद्धतीने घेतल्या जातात. त्या त्या विषयांवरील ताजे संशाधन, प्रयोग, अभ्यास आणि या सगळ्यांवर आधारित उपाय-योजना, या अत्यंत लोकप्रिय कार्यशाळांमध्ये सांगितली जाते.
|
|
लोणावळा येथील प्रयोगकेंद्रात घेण्यात येणार्या चाचण्या या अजोड आहेत. त्यातल्या बऱ्याच चाचण्या या मानसिक (मनाच्या) पातळीवर असतात. चाचणी करून घेण्याचा उद्देश ‘त्या त्या व्यक्तीच्या मनाच्या शक्तीचे मूल्यमापन व आंतरशक्तीची जुळवणूक’ असा आहे. चाचण्या घेण्यासाठी लागणारी यंत्रे (मशिन्स) प्रयोगकेंद्रातच बनवलेली आहेत.
|
विज्ञानातल्या रेझोनान्स या नियमाप्रमाणे, सामुदायिकतेने, गुणित शक्तीचा लाभ मिळतो. त्यामुळे मनशक्ती प्रयोगकेंद्रात सर्व पूजा उपक्रम सामुदायिक घेतले जातात.
|
|
मनशक्ती केंद्राच्या वतीने ‘मनशक्ती’ नावाचे मासिक प्रकाशन चालवण्यात येते. यावर्षी या मासिकाचे ‘रौप्य महोत्सवी वर्ष’ आहे. कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीच्या व प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त सदरे यात असतात. या मासिकाचे हजारो वर्गणीदार आहेत.
|
‘मनशक्ती’तर्फे राबविल्या जाणा-या अनेक सेवा उपक्रमापैकी ‘हेल्थ न्यू वे’ या आरोग्यासंबंधित नोंदलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘स्वानंद’ या स्वतंत्र विभागातर्फे, चाकण येथील ट्रस्टच्या जागेत आयुर्वेदिय औषधे निर्माण केली जातात.
|
|
स्वामीजींनी न्यू वे तत्वज्ञानाबद्दलच्या कल्पना विविध पुस्तकमालांमधून १९५८ च्या सुमारास मांडल्या. ‘जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन’ हा विषय प्रामुख्याने त्यामध्ये आहे. सुरवातीच्या या मालिका स्वामीजींनी इंग्रजीमधून लिहिलेल्या ‘परपज ऑफ युनिव्हर्स’ अशांसारख्या विषयांपासून ते ‘इक्वेशन ऑफ हॅपीनेस’ असे माणसाच्या सुखदुःखाशी निगडीत असणारे विषय त्यांनी घेतले.
|
स्वामीजींनी न्यू वे तत्वज्ञानाबद्दलच्या कल्पान विविध पुस्तकमालांमधून 1958च्या सुमारास मांडल्या. “जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन” हा विषय प्रामुख्याने त्यामध्ये आहे. सुरुवातीच्या या मालिका स्वामीजींनी इंग्रजीमधून लिहिल्या. ‘परपज ऑफ युनिव्हर्स’ अशांसारख्या विषयांपासून ते ‘इक्वेशन ऑफ हॅपिनेस’ असे माणसाच्या सुखदु:खाशी निगडीत असणारे विषय त्यांनी घेतले.
|
|
जे मनशक्तीचे साधक, दरमहा, प्रतिगती तत्त्वाने धनानंद घेतात, त्यांना कोअर बँकिंगद्वारे, मनशक्ती ट्रस्टकडे धनानंद जमा करता येईल.
|
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२










