पुस्तके

स्वामीजींनी न्यू वे तत्वज्ञानाबद्दलच्या कल्पना विविध पुस्तकमालांमधून १९५८ च्या सुमारास मांडल्या. ‘जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन’ हा विषय प्रामुख्याने त्यामध्ये आहे. सुरवातीच्या या मालिका स्वामीजींनी इंग्रजीमधून लिहिलेल्या ‘परपज ऑफ युनिव्हर्स’ अशांसारख्या विषयांपासून ते ‘इक्वेशन ऑफ हॅपीनेस’ असे माणसाच्या सुखदुःखाशी निगडीत असणारे विषय त्यांनी घेतले.

स्वामीजींनी ४० वर्षाहून अधिक काळ त्यांनी बहुव्यापी संशोधन केले. जन्मपूर्व अवस्था ते मृत्युपश्‍चात जीवन यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यांच्या अभ्यास अनुभवातून साकारली आहे, २५० हून अधिक ग्रंथांची न्यू वे साहित्य ग्रंथमाला. रंजक, उद्बोधक, जीवनाला नवी दिशा देणारी. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ताणमुक्त यश आणि नि:शाप सुख मिळविण्याच्या युक्तया सांगणारी. बुध्दिवाद हा यातील प्रत्येक ग्रंथाचा आधार आहे. विज्ञान, विवेचन, संशोधनात्मक, तत्वविश्‍लेषक इत्यादि बहुविध साहित्य प्रकारांनी समृध्द व माणसाला समर्थ करणारे असे हे संजीवक साहित्य.

संस्थेचा छपाई विभाग अत्यंत अद्ययावत असून त्यामध्ये टाइपसेटिंग, विविधरंगी छपाई, बाईंडिंगपर्यंत सर्व प्रक्रिया एका छताखाली केल्या जातात. स्वतःचाच प्रेस असल्यामुळे मोठी मागणी असली तरीसुद्धा सर्व पुस्तके शक्यतो लगेच उपलब्ध करून दिली जातात नवनवीन आवृत्यांत आवश्यक तेथे अधिक माहिती दिलेली असते.

या ठिकाणी ग्रंथाची भाषावार व विषयावार संदर्भसूचि दिली आहे. त्याप्रमाणे पुस्तके मागवता येतील.

पुस्तक विभागातील सर्व पुस्तकांची माहिती, नजिकच्या काळात प्रसिद्ध केली जाइल.

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView