गर्भसंस्कार कार्यशाळा

३९३ कार्यशाळांमध्ये २१,२४० जोडप्यांचा सहभाग

२००२ साली सुरु केलेली एक दिवसाची गर्भसंस्कार कार्यशाळा, अफाट लोकप्रिय झाली आहे! गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यात यामध्ये सहभागी होता येते. लोणावळा तसेच संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, शहरी व ग्रामीण भागात, मराठी व इंग्रजीतसुद्घा ही समूल्य कार्यशाळा घेतली जाते.

वैशिष्ट्ये

  • गर्भाला जाणीव व स्मृती असते याचे वैज्ञानिक पुरावे.
  • गर्भाच्या विकासाचे टप्पे (व्हिडियो)
  • जन्माचा क्षण (ऍनिमेशन)
  • प्रार्थनाशक्ती, प्रकाशशक्ती याआधारे गर्भावर संस्कारप्रयोग
  • गरोदरपणातील प्रार्थना, वाचन, एकाग्रता, संगीत, योगासने
  • चाचणी आणि वैयक्तिक कॉम्प्युटराइज्ड् निष्कर्ष इ.

कार्यशाळेत कोण सहभागी होऊ शकते? - फक्त गर्भधारी जोडपी (गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापसून ते नवव्या महिन्यापर्यंत.)
भाषा : मराठी आणि इंग्रजी
कालावधी : सुमारे ६ तास

देणगीमूल्य: रु. ६००/- (गर्भवती पत्नी व पतीसाठीच. एक व्यक्ती जरी आली तरी देणगीमूल्य तेवढेच.)
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्‌यांसाठी आहे. आपल्या जवळच्या स्थानिक केंद्रात किंवा साधकांकडे जमा करुन पावती घ्यावी.
लोणावळ्याच्या मुख्य केंद्रात होणाऱ्या कार्यशाळेस नावनोंद करण्यासाठी येथे क्लिक करा

‘स्वामीजींच्या प्रार्थना खूप तल्लीन होऊन ऐकली. मन इतकं एकाग्र होतं, की आजूबाजूचं भानच नव्हतं. खूप शांत असं मनाला भासलं त्यात खूप ऊर्जा (एनर्जी) असल्याचं वाटलं, की त्यामुळे एक वेगळीच प्रचिती अनुभवयाला मिळाली. गर्भसंस्कार कार्यशाळेत आल्यावर खूपशा गोष्टीच निरसन झालं. त्यामुळे मनावरचा ताण हलका झाला. अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळाल्यावर कसे फायदे होतात, हे जाणवलं. एकूण खूप बरं वाटलं, समाधान झालं.

श्री. अजित देवरकर, फार्मासिस्ट

मी येथे येण्यापूर्वी मला ‘मनशक्ती’ हे पूर्णपणे नवखे होते, फक्त बरेच काही ऐकल्यामुळे, मी मनात प्रचंड शंका घेऊन येथे पोहचले. पण आपण दिलेल्या सर्व ज्ञानाने, प्रार्थनेने आता मनशक्ती मला आपले नवीन घर वाटते आहे. जेथे कोणत्याही शंकेचे निरसन होईल आणि सखोल ज्ञान पुरेपूर मिळेल. प्रार्थनेनंतरची मनःशांती, सुखावा हा अनुभव माझ्यासाठी जरा नवीनच वाटला.

सौ. शिल्पा जोशी-चिमड, बी.ई.

खरोखरीच अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आहे. सर्व समाजाच्या उन्नतीसाठी याचा उपयोग निश्चित होईल, यात शंका नाही. सदर कार्यक्रमात सहभागी होऊन माझी संतती निश्चितच सर्वगुणसंपन्न होईल, ही मला खात्री आहे.

श्री. शाम कुलकर्णी, बी. कॉम, एम.बी.ए., जी.डी.सी.

‘स्वामीजींची प्रार्थना ऐकताना शांत वाटले. तसेच बाळही प्रार्थना ऐकत आहे असे वाटले. आपण प्रार्थनेप्रमाणे बाळाला घडवणार आहोत, असा आत्मविश्वास वाटला’

श्रीमती स्वाती नार्वेकर, बी. कॉम

मी ‘मनशक्ती ‘ मासिकाची नियमित वाचक आहे. मी मनशक्ती परिवारातील साधक श्री.बाळकृष्ण सनये यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या 30जुलै 2000च्या ‘परीक्षा धैर्यवर्ग -दहावी / बारावी ‘ या वर्गासाठी उपस्थित होते.
त्याआधीही ‘बुध्दिवर्धन ‘ वर्ग (वय 8 ते 14) या तीन दिवसीय शिबीरातून आपले मार्गदर्शन घेतले होते. मेंदू व्यायाम, स्टिकर्स, झोपेतून शिक्षणपध्दती अशा अनेक सूचनांचा मला खूप उपयोग झाला. इतिहासाच्या अभ्यासासाठी मी बुध्दिवर्धन पध्दत वापरली आणि सरावाने कठीण वाटणारा विषय सोपा बनला. तसेच सायंकाळी 7.30 वाजता प्रकाशध्यान केल्याने व गायत्री मंत्र म्हटल्याने एकाग्रता वाढवण्यासाठीही खूप उपयोग झाला.
आपण मला केलेल्या मौल्यवान मार्गदर्शनासाठी मी नेहमीच आपली ऋणी आहे. मी व माझे कुटुंबीय ‘मनशक्ती ‘च्या कार्याचा प्रसार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू.
मनशक्ती परिवारास व त्यांच्या कार्यासाठी माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबियंातर्फे हार्दिक शुभेच्छा!
मला आपणास कळविण्यास आनंद होत ओे की मी कु.प्रज्ञा गोविंद नाईक दहावीच्या शालान्त परीक्षेत 91.06% मार्क्स मिळवून मुंबई विभागात गुणवत्ता यादीत 17व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
आपण दादर येथे घेत असलेल्या ‘व्यक्तिमव्व विकास ‘ या शिबिराच्या पहिल्या वर्गास मी उपस्थित होते व या अमूल्या मार्गदर्शनाचा लाभ मी यापुढेही घेणार आहे.

प्रतिक्रिया 11
गर्भसंस्कार कार्यशाळा
गर्भसंस्कार कार्यशाळा

Videos to be uploaded shortly.

गर्भसंस्कार कार्यशाळा - 03/06/12 ठाणे 03/06/2012 शिल्लक श्री. पराडकर : ९९२०४१५९८०, श्री. चक्के : ९८६९४६८६५१
गर्भसंस्कार कार्यशाळा - 10/06/12 लोणावळा 10/06/2012 शिल्लक ऑफिस : ०२११४ - २३४३७९, २३४३८०
गर्भसंस्कार कार्यशाळा - 14/06/12 चाकण 14/06/2012 शिल्लक श्री. संधान : ८८०५२६२६९०, श्री. फापाळे : ९८५०५४७९७९
गर्भसंस्कार कार्यशाळा - 24/06/12 पुणे 24/06/2012 शिल्लक श्रीमती कुलकर्णी - ०९३७१००८७५८, पुणे केंद्र - (०२०) २४४७७९७९
गर्भसंस्कार कार्यशाळा - 01/07/12 डोंबिवली 01/07/2012 शिल्लक श्रीम. साखरकर : ८९७६१५७२५४, श्री. महाजन : ९८३३१२०१०९
गर्भसंस्कार कार्यशाळा - 12/07/12 पिंपरी 12/07/2012 शिल्लक श्री. कोल्हे : ९८२३८९७४७८, श्री. कडेकर : ९९७०८०१८१४
गर्भसंस्कार कार्यशाळा - 21/07/12 लोणावळा 21/07/2012 शिल्लक ऑफिस : ०२११४ - २३४३७९, २३४३८०
गर्भसंस्कार कार्यशाळा - 22/07/12 दादर 22/07/2012 शिल्लक श्रीम. पुरोहित : ९८१९१३३०१७, श्री. पुळेकर : ९९३०२६०५६४
गर्भसंस्कार कार्यशाळा - 29/07/12 कल्याण 29/07/2012 शिल्लक श्री. अहिरराव - (०२५१) २३२०९१९, श्री. भावे - ९८९२१७७०९६

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView