मेंदूक्रांती कार्यशाळा
जन्मजात स्थिती, अनुवंशिकतेने घडलेल्या मेंदूला प्रयत्नांनी विकसित करता येईल का? निश्चिरत येईल. मुलाचे मूळ व्यक्तिमत्व आणि पालकांकडून होणारे पोषण यांच्या सूयोग्य मेळातून घडते एक परिपूर्ण व्यक्तिमत्व. याचा मेळ साधायला पालकांकडून सुरूवातीपासूनच योजनाबद्ध प्रयत्न व्हायला हवेत. आपलं मूल, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं भवितव्य, खूप चांगलं घडवायचंय, पण कसं? पालकत्वाच्या नेमक्या भूमिकेचं उत्तम विश्लेषण करणारी
मेंदूक्रांती कार्यशाळा.
कार्यशाळेची वैशिष्ट्ये
- मुलाची मनस्थिती, मेंदूस्थिती जाणून करण्याचे उपाय
- मुलाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा
- मेंदूस्पर्श, एकाग्रता प्रार्थना प्रयोग, मित्र, शाळा इ. माध्यमातून होणारा सामाजिक विकास
- भावनाकांचे महत्त्व
- बहुविध बुद्धिमत्ता कशी मिळविता येईल.
मुलांची प्रगती आणि पालकांची स्वप्न यांचा सुयोग्य मेळ सहज साधत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मनशक्तीच्या अभिनव संशोधनातून आलेले प्रभावी उपाय तुमच्याही मुलाची मेंदूक्रांती घडवतील.
मुले लहान आहेत; त्यांना काय कळते? हा विचार प्रत्येक पालकाने मनातून काढून टाकला पाहिजे. प्रौढांपेक्षा बालकाचा मेंदू कित्येक पटीने ग्रहणक्षम असतो. मूल बोलण्यातून सगळ्या गोष्टी व्यक्त करू शकत नाही, म्हणून आपल्याला त्यांच्या बुद्धिमत्तेचा अंदाज येत नाही. सभोवतालच्या प्रसंगांचे बारकाईने निरीक्षण करून स्वत:च्या पद्धतीने निष्कर्ष काढत, मुले मनात सर्व साठवून ठेवतात. १ ते७ वर्षे वय हा काळ व्यक्त करण्यापेक्षा ग्रहण करण्याचा असतो.
मुलांनी कशाचे निरीक्षण करावे आणि त्यापासून काय शिकावे, याबाबत जागरूक पालक योग्य प्रयत्न करू शकतात. पालकांच्या या प्रयत्नांना दिशा देणारे मार्गदर्शन या कार्यशाळेत असते.
देणगीमूल्य : रु. ३००/- प्रति व्यक्तीस
सदर देणगीमूल्य ऑनलाइन पैसे भरणार्यांसाठी आहे. आपल्या जवळच्या स्थानिक केंद्रात किंवा साधकांकडे जमा करुन पावती घ्यावी.
Videos to be uploaded shortly.
| मेंदूक्रांती कार्यशाळा - 07/07/12 | ठाणे | 07/07/2012 | शिल्लक | श्री. पराडकर : ९९२०४१५९८०, श्री. चक्के : ९८६९४६८६५१ | |
| मेंदूक्रांती कार्यशाळा - 14/07/12 | विरार | 14/07/2012 | शिल्लक | श्री. मसुरकर : ०२५०- ६८१९५३३ , श्रीमती वर्तक : २५११११२ | |
| मेंदूक्रांती कार्यशाळा - 28/07/12 | जोगेश्वरी | 28/07/2012 | शिल्लक | श्रीम. लवंदे : ९९६७५००७४८, श्रीम. चौगुले : ९८९२२९६३०९ | |
| मेंदूक्रांती कार्यशाळा - 29/07/12 | डोंबिवली | 29/07/2012 | शिल्लक | श्रीम. साखरकर : ८९७६१५७२५४, श्री. महाजन : ९८३३१२०१०९ |
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

