उपक्रम
![]() |
मशिन टेस्ट
लोणावळा येथील प्रयोगकेंद्रात घेण्यात येणाऱ्या चाचण्या या अजोड आहेत. त्यातल्या बऱ्याच चाचण्या या मानसिक (मनाच्या) पातळीवर असतात. चाचणी करून घेण्याचा उद्देश ‘त्या त्या व्यक्तीच्या मनाच्या शक्तीचे मूल्यमापन व आंतरशक्तीची जुळवणूक’ असा आहे. चाचण्या घेण्यासाठी लागणारी यंत्रे (मशिन्स) प्रयोगकेंद्रातच बनवलेली आहेत. |
![]() |
अभ्यासवर्ग
अनेक वर्षांच्या संशोधनातून साकारलेले माणसाच्या सुखाचे गणित म्हणजे ‘न्यू वे’चे अभ्यासवर्ग. माणसांच्या संकटांवर उपाय सुचविणारे, संकटे येऊ नयेत म्हणून कसे वागावे हे सांगणारे. पदार्थ-विज्ञानशास्त्र, गणित, तर्कशास्त्र या विज्ञानत्रयींच्या आधारे मांडलेले सिद्धान्त हे प्रत्येक वर्गाचे खास वैशिष्ट्य. |
![]() |
कार्यशाळा
मनशक्तीतर्फे, समाजातील शहरी आणि ग्रामीण परिसरात, वेगवेगळ्या वयोगटांसाठी, विविध विषयांवर एक दिवसीय कार्यशाळा, दृक्श्राव्य पद्धतीने घेतल्या जातात. त्या त्या विषयांवरील ताजे संशाधन, प्रयोग, अभ्यास आणि या सगळ्यांवर आधारित उपाय-योजना, या अत्यंत लोकप्रिय कार्यशाळांमध्ये सांगितली जाते. |
![]() |
पुजा उपक्रम
विज्ञानातल्या रेझोनान्स या नियमाप्रमाणे, सामुदायिकतेने, गुणित शक्तीचा लाभ मिळतो. त्यामुळे मनशक्ती प्रयोगकेंद्रात सर्व पूजा उपक्रम सामुदायिक घेतले जातात. |
![]() |
विनामूल्य उपक्रम
मनशक्तीच्या अन्यायित स्वावलंबन विभागातर्फे, आदिवासींना स्वावलंबी करण्यासाठी, तसेच ग्रामीण परिसरातील अनाथ - गरीब - व गरजू विद्यार्थी यांसाठी विविध विनामूल्य उपक्रम राबविले जातात. उदाहरणार्थ, शिक्षण संस्कार शिबिर, कमवा शिका योजना, वैद्यकीय शिबिरे इ. |
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२






