ग्रामीण उपक्रम
पुण्यापासून 20 मैलावर वसलेले चाकण तसे खेडेगावच. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चाकण गावात संग्राम दुर्ग किल्ल्याचा कोट फक्त शिल्लक राहिला आहे. मनशक्ती प्रयोग केंद्राने ग्रामीण संपर्कासाठी हे गाव निवडले. 1972साली तेथील हायस्कूल शिक्षक व साधक श्री. संधान सर यांनी या कार्याला वाहून घेतले. सुरुवातीच्या काळामध्ये तेथे ‘गीता ज्ञान प्रसारवर्ग’ घेतले जात. त्याचप्रमाणे मंत्र आणि संगीत यांचे पिकावर होणारे प्रयोग सुरू झाले. 1978साली ‘मनशक्ती’प्रेरित ‘ग्राम सेवा समिती’ची स्थापना झाली व तेथील कार्याला पध्दतशीर दिशा मिळाली. आज एकेकाळी ओसाड माळरान असलेली सुमारे 4 एकरची जागा बहुद्देशीय वनस्पतींच्या लागवडीने बहरलेली आहे.
ग्रामसेवा समितीच्या माध्यमातू खालील उपक्रम चाकण येथे चालतात.
- विनामूल्य `शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप'
- विनामूल्य `ताणमुक्त परीक्षा यश बैठका'
- विनामूल्य `किशोरी प्रकल्प'
- बाळगोपाळांसाठी `मनशक्ती बाल-संस्कार वाटिका'
- विद्यार्थ्यांसाठी `ग्रामोध्दार शिक्षण संस्कार योजना'
- ग्रामीण युवकांसाठी `कमवा-शिका योजना'
- शेतकर्यांसाठी, `गायत्री मंत्र प्रेरित शेती प्रयोग'
- वृक्षारोपण व संवर्धन
- सर्वांसाठी `गायत्री क्लिनिक'
- सर्वांसाठी `पंचकर्म आयुर्वेदीय आरोग्य केंद्र'
- सर्वांसाठी ``स्वानंद आयुर्वेदीय औषध उत्पादने'
- कीर्तन प्रवचन माध्यम
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

