देणग्या नकोत, सुट्टी नाही

देणग्या नकोत
संस्था म्हटले की देणगी आलीच. पण मनशक्ती प्रयोगकेंद्राचे तीनही ट्रस्ट देणगी घेत नाहीत. त्याच बरोबर सरकारी अनुदानेसुध्दा स्वीकारली जात नाहीत. परदेशातील पैशांचीही मदत घेतली जात नाही.गेल्या 35 वर्षात हळू हळू पण निश्चितपणे उभारणी झालेले हे एक स्वयंपूर्ण केंद्र आहे. या केंद्र उभारणीत प्रत्येक साधकाचा वाटा आहे. त्यामुळेच हे केंद्र सगळ्यांचे आहे.
मनशक्ती प्रयोगकेंद्राला सुट्टी नसते. अविरत श्रमानंद घेणाऱ्यांचे हे केंद्र असल्याने येथे सुट्टी नसते. उलट शनिवार / रविवार इतर ठिकाणी सुट्टी असल्याने लोणावळे येथे प्रयोगकेंद्र पहायला येणाऱ्यांची गर्दी खूपच असते.
लोणावळष येथे प्रयोगकेंद्रात अशा तऱ्हेने कार्य करणारे सुमारे 125 जीवनदानी साधक आहेत. जीवनदान म्हणजे ज्यांनी संपूर्ण वेळ समाजासाठी देऊन टाकला आहे व ज्याचा मोबदला ते घेत नाहीत असे कार्यकर्ते. सुरक्षा विभाग, वाहन चालक इत्यादी पासून ते संशोधनासारखी कामे करणाऱ्या सर्व जीवनदानी व्यक्ती आहेत.
लोणावळे येथे केंद्रात एक अभिनव कल्पना राबविली आहे. हे सर्व कार्यकर्ते एकत्र राहतात. जेवणासाठी एकत्रित स्वयंपाक केला जातो. इतर गरजासुध्दा सामुदायिक पातळीवर भागवल्या आहेत. त्यागाचा मोबदला कोणीच घेत नसल्याने येथे कोणीही नोकरीला नाही. मालक / नोकर असे नाते नसलेले पण जबाबदारीवर आधारित, जास्तीत जास्त समता असलेले असे हे प्रयोगकेंद्र लोणावळ्यात असेल अशी कल्पना सुध्दा येणार नाही.
असे हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र पाहण्यासाठी आपले लोणावळ्याला रोज स्वागत आहे.
वेळा आहेत: स.9ते दु.1 व दु.2 ते साय.6
सुट्टी नसते.

सुट्टी नाही

यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती

(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

View CatelogueView