प्रश्नमंजुषा

मनशक्तीच्या १ दिवसीय गर्भसंस्कार कार्यशाळेची माहिती कुठे मिळेल?
ही माहिती येथे मिळेल - http://www.manashakti.org/mr/karyashala/गर्भसंस्कार-कार्यशाळा

मनशक्तीच्या ३ दिवसीय गर्भसामर्थ्य अभ्यासवर्गाची माहिती कुठे मिळेल?
ही माहिती येथे मिळेल - http://www.manashakti.org/mr/abhyasvarga/गर्भसामर्थ्य

‘न्यू वे’ हे नाव कशासाठी?
स्वामी विज्ञानानंद यांनी प्रारंभी ‘सुखासाठी न्यू वे’ या विषयी वृत्तपत्रात लेखमाला दिली होती. या मालिकेस प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ‘न्यू वे’ ची लेखमाला म्हणून ती लोकांच्या लक्षात राहिली. या करिता ‘न्यू वे’ हेच नाव ट्रस्टचे ठेवण्यात आले.

‘न्यू वे’ ची सुरुवात केव्हा झाली?
१९६३ मध्ये स्वामीजींनी संन्यास घेतला. नंतरची दोन वर्षे निरनिराळ्या तपाचरणात कारणी लावली. १९६५ च्या सुमारास तत्व परिचित झालेल्या काही मोजक्या साधकांनी समाजसेवेस सुरवात केली. त्यांची परिणती १९६८ मध्ये ‘न्यू वे’ आश्रम या पहिल्या ट्रस्टच्या स्थापनेत झाली.

‘न्यू वे’ ची वाटचाल कशी होते?
समाजासाठी श्रमानंद किंवा धनानंद घेण्याचा संकल्प करणाऱ्या प्रतिज्ञित व्यक्तींचे एकत्र ‘अध्यात्मिक कुटुंब’ मानले जाते.
सुरूवातीस मनशक्ती प्रयोग केंद्रावर उत्सुकतेने लोक ‘नवागत’ म्हणून येतात. केंद्राचे कार्य-कार्यक्रम पाहतात. पुस्तके-ग्रंथ वाचतात. आणि तत्व समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. सरासरीने एक हजार नवागत दरमहा भेट देतात. काही नवागत केंद्राच्या कार्यात भाग घ्यायला सुरवात करतात. आणि अधिक अभ्यास म्हणून तीनतीन दिवसांची ज्ञानसत्रे (शिबिरे) पूर्ण करतात. काहीजण आश्रमात होणाऱ्या सत्यपूजेत भाग घेतात. हे सर्व नवागत अध्यात्मिक कुटुंबाचे ‘अभ्यागत’ म्हणून समजले जातात. अशा तऱ्हेने दरमहा ५०० ‘अभ्यागत’ निरनिरळ्या शिबिरात भाग घेतात व सुमारे २५० ‘अभ्यागत’ निरनिराळ्या वैज्ञानिक चाचण्या करून घेतात.
कौटुंबिक जबाबदारी कर्तव्ये पार पाडत असताना व सुखसमृद्धीचा अनुभव घेत असतानाच सामाजिक बांधिलकीची जाणीव, समाजसेवेच्या मार्गाने करण्याचा संकल्प केलेल्यांना आध्यात्मिक कुटुंबात साधक मानले जाते. हे साधक आश्रम निर्देशित समाजकार्यात सातत्याने श्रमानंद, धनानंद किंवा दोन्ही घेतात. असे पाच हजार साधक आजमितीस आहेत.
जे पूर्ण वेळ आश्रम कार्याशी बांधिलकी पत्करतात त्या साधकांना ‘जीवनदानी’ साधक संबोधले जाते.

हितचिंतक अभ्यागत राहून काय करू शकाल?
१) शक्य होईल तेवढा श्रमानंद किंवा धनानंद संकल्पपूर्वक घेणे.
२) सल्ला मार्गदर्शन करणे.
३) माहिती केंद्र किंवा संस्कार वर्ग काढणे.
४) ट्रस्टच्या प्रकल्पात भाग घेणे.
५) व्यापारी संघ, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, शासकीय कचेऱ्या, स्त्री संघटना व सामान्य नागरिकात प्रचार करणे.

‘न्यू वे’ ट्रस्टचे स्वरुप काय आहे?
‘न्यू वे’ चे मुख्यतः तीन ट्रस्टस आहेत.
१) मनशक्ती न्यू वे आश्रम
२) मनशक्ती (रिसर्च, एज्युकेशन, सॅनिटोरिअम, ट्रस्ट) रेस्ट न्यू वे.
३) हेल्थ न्यू वे.
या पैकी फक्त ‘न्यू वे आश्रम’ ह्या ट्रस्टचे स्वामीजी ट्रस्टी होते. सर्व ट्रस्टस् देणगी किंवा शासकीय अनुदान घेत नाहीत. सर्व ट्रस्टसवर आध्यामिक कुटुंब साधकांनी निवडून दिलेले ट्रस्टी, जीवनदानी साधकांच्या मार्फत आश्रम कार्यावर नियंत्रण ठेवतात.
स्वामी विज्ञानानंदांनी स्वतःचे अधिकचे उत्पन्न, ते विश्वस्त नसलेल्या रेस्ट न्यू वे ट्रस्टला दिले. पूर्ण वेळ दिवसाचे अठरा अठरा तास काम, संशोधन व मार्गदर्शन हीच त्यांची भूमिका होती. सर्व ट्रस्टसचे कार्य जात, वंश, देश व धर्मनिरपेक्ष चालते.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView