रुचि प्रयोग
मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ, तुम्हाला एक उपहारगृह दिसेल, जेथे तुम्हाला सुखद व रम्य वातावरणात, रूचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. अर्थात, हे नेहमीसारखे उपहागृह नसून, हा रूचि प्रयोग विभाग आहे. या ठिकाणी उत्तम खाद्यपदार्थाबरोबर, आरोग्यासाठी योग्य पदार्थ तुम्ही घ्यावेत, याचे मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल.
डॉ. आर्थर कोका यांनी शोधून काढलेल्या ‘नाडी परीक्षा चाचणी’द्वारे (The Pulse Test), तुमच्यासाठी सुयोग्य अन्नपदार्थ कोणते व कोणत्या पदार्थांनी तुम्हाला ऍलर्जीचा त्रास होण्याची शक्यता आहे, हे शोधून काढता येते. रूचि प्रयोगाअंतर्गत तुमच्या आरोग्यासाठी खालील सोयी उपलब्ध आहेत.
नाडी परीक्षा चाचणी
जर तुम्हाला वारंवार नैराश्याचा त्रास, थकवा व निद्रानाशाचा त्रास होत असेल, आणि यापासून सुटका होण्याचे तुमचे प्रयत्न विफल होत असतील, तर तुम्हाला ऍलर्जीची दाट शक्यता आहे. वरील लक्षणे कोणत्याही व्याधीमुळे नाहीत असे तुमच्या डॉक्टरांचे म्हणणे असेल, तर तुमच्या त्रासाचे कारण ऍलर्जी असू शकेल. खाली दिलेल्या क्रांतीकारी पण सोप्या पद्धतीच्या सहाय्याने कोणत्या पदार्थांनी व वासाने तुम्हाला ऍलर्जीचा त्रास होतो, हे शोधून काढता येते, व या गोष्टी टाळून तुम्हाला निरोगी अवस्थेत राहता येते.
तत्व
ही ऍलर्जी निदानाची पद्धत मूलत: सुलभ आहे. ऍलर्जी उत्पन्न करणार्या- पदार्थांनी नाडी वाढ होते. या तत्वावर ती आधारित आहे. या पद्धतीत, वेगवेगळे अन्नपदार्थ स्वतंत्रपणे खाऊन कोणत्या अन्नपदार्थाने नाडीवाढ होते, हे शोधून काढणे अभिप्रेत आहे.
तुमची नाडी मोजा :
रूची प्रयोगात उपलब्ध असलेल्या यंत्राच्या सहाय्याने तुमची नाडी अचूक मोजता येते. हाताने मनगटावर नाडी मोजण्यापेक्षा, या यंत्राच्या सहाय्याने त्वरित व विश्वासार्ह अशी अचूक नाडी नोंद करता येते.
तुमचा रक्तदाब मोजा: सध्याच्या ताणयुगात प्रवाशांनी व इतरेजनांनी, त्याच्या रक्तदाबाची मोजणी करून घेणे आवश्यक आहे. रूची प्रयोगात ही सोय उपलब्ध आहे.
तुमचे वजन मोजा:
तुमच्या वजनावरून तुमच्या आरोग्याविषयी अनेक महत्वाच्या गोष्टी समजू शकतात. डिजिटल इलेक्ट्रोॅनिक वजन करण्याचे यंत्र यासाठी खास रूची प्रयोगात आणले आहे. २० ग्रॅम इतक्या सूक्ष्म प्रमाणातील वजनातील बदल हे यंत्र मोजू शकते. व्यायामाचा शरीरावर होणारा परिणाम मोजण्यासाठी हे यंत्र फार उपयुक्त आहे.
अशा ह्या प्रयोगांमध्ये भाग घेण्यासाठी, रूचि प्रयोग विभागात नावनोंद करा.
येथे तुम्हाला नैसर्गिक पोषण नवे असलेल्या रूचकर पदार्थांचा आस्वाद घेता येईल. या प्रयोगात भाग घेऊन तुमची आंतरिक शक्ती तुम्हाला वाढविता येईल. तसेच, आता तुम्हाला लक्षात आले असेल की रूचि प्रयोग हे नुसते उपहारगृह नसून, तुमच्या व एकूणच समाजाच्या आरोग्यवृद्धिसाठीचे प्रयोग समजावून घेण्याचे एक विश्रांती स्थळ आहे. या केंद्रातील वातावरण गायत्री मंत्राच्या उच्चारणामुळे, शक्तीदायी, शक्तीभारीत झाले आहे. प्रयोगकेंद्राची माहिती घेण्यासाठी रोज येणार नवागत, अभ्यासवर्ग - मशीन टेस्ट - सहली इ. विविध उपक्रमांसाठी येणारे नवागत, साधक अशा सर्वांसाठीच ‘रुचि प्रयोग’ हे एक रम्य, रुचकर आनंदनिधान आहे! या परिसरात जेव्हा तुम्ही याल तेव्हा सर्वांच्या हितार्थ खालील गोष्टी टाळाव्यात -
- थुंकणे
- धुम्रपान व सर्व प्रकारची व्यसने
- मद्यपान: या परिसरात निश्चित नाही, पण येथे येण्यापूर्वीही, प्रयोगात व्यत्यय न येण्यासाठी ते टाळा.
यंत्रचाचण्या आणि
सायको-फीडबॅक उपचारपध्दती
(पूर्व नावनोंदणीनेच)
नावनोंदणीसाठी कृपया येथे संपर्क साधा.
+९१-२११४-२३४३२०; २३४३२१
सोम. ते शुक्र. स. ९ ते दु. १२

