मुलांसाठी श्रमसंस्कार, छंद शिबिरे

Gramin Shibir- 1
Gramin Shibir- 2

एप्रिल, मे हा मुलांचा आणि मनोरंजनाचा करमणुकीचा कालावधी. कधी पालकांसह, तर कधी मित्रांसह विविध सहली, सांस्कृतिक स्थळं, निसर्ग मनसोक्त पाहाण्याचा. हा कालावधी उन्हाळा असूनही हवाहवासा आणि आल्हाददायक वाटतो.

१९७० साली स्वामीजींनी युवकांसाठी लोणावळा येथे ‘नेतृत्व विकास शिबिर’ घेतले होते. त्यावेळीही युवकांचा सहभाग स्वयंप्रेरक होता. तेव्हापासून अभ्यास वर्ग शिबिरे आयोजित होऊ लागली. त्याचा लाभ हजारो मुलांना होत आहे. तरीही याच कालावधीत साधकांची मुले व काही साधकांना लोणावळा केंद्र किंवा उपकेंद्रात शिबिरात सहभागी होण्याची इच्छा असते.

मनशक्तीमध्ये विविध वयोगटांच्या मुलांसाठी ३ दिवसाची शिबिरे चालू असतात. काही गरजू, गरीब मुलांसाठी विनामूल्य ग्रामीण संस्कार शिबिरे लोणावळा येथे सुरु असतात. मुंलाच्या जडणघडणीत पालकांचा, साधकांचा सहभाग असावा आणि मुले, पालक आणि साधक या सर्वांनाच आनंद मिळावा म्हणून ७ दिवसाचे उन्हाळी श्रमानंद संस्कार शिबिर सुरु करण्याचा मनशक्तीच्या कार्यकर्त्याचा मानस आहे.

या शिबिरात श्रमाचे महत्त्व व आनंद असा दुहेरी मेळ घातला जाईल. आपल्या वयाच्या आदिवासी/वंचित मुलांशी परिचय करुन त्यांच्यासह काही सेवा, संधी या शिबिरातून मिळेल. आवडणारे खेळ/ छंद जोपासण्याची संधी, निसर्गाचे निरिक्षण/परिक्षण आणि संरक्षण करण्याची जिद्द, उत्सुकता निर्माण होईल असे उपक्रम असतील.

स्वामीजींनी सुचित केलेले मेंदूशास्त्रावरचे प्रयोग/गुण वाढवणारे उपक्रम मुलांसमोर ठेवले जातील. त्यातून त्यांची निवड करुन आपापसात गुण वाढवून, दोष कमी करण्याचा स्वयंप्रयत्न करावयाचे, स्वत:चे अनुभव इतरांसोबत शेअर करण्याची संधीही उपलब्ध असेल.

मनशक्तीचे युवा- कार्यकर्ते न्यू वे तत्त्वज्ञानाचा अभ्यास, माहिती या उपक्रमातून मुलांना देतील. स्वामी विज्ञानानंदाचे प्रयोग विवेचन ऐकण्याची संधी ही आहेच.

यावर्षी मे महिन्याचा २१ ते २७ तारखेस हे ७ दिवसाचे शिबिर होईल. इयत्ता ६ वी ८ वी ची मुले मुली पालकांसह सहभागी होऊ शकतील. प्रवेश मर्यादित.

नावनोंदीसाठी संपर्कासाठी- ०२११४-२३४३३०/३१ भ्रमणध्वनी- ९७६२२२७१०४

Machine Tests &
Psycho-Feedback Therapy

(with prior appointment only)
For booking, please contact on
+91-2114-234320/21/22
(Mon. to Fri. - 9 am to 12 noon)

View Catelogue.jpgView