धर्माचे अधार्मिक भांडण

Date: 
Sun, 4 Sep 2011

धार्मिकाचे अधार्मिक भांडण
पारतंत्र्याच्या काळातली ही गोष्ट आहे. मध्यम अशा तालुक्याच्या गावात छोटेसे चर्च. तिथला एक पाद्री, राज्यकर्ते आपल्या धर्माचे आहेत अशा प्रौढीने फुगलेला.
त्यातच गावातल्या दुय्यम अधिकाऱ्याबरोबर गावाबाहेर फिरण्याचा योग आला. तेव्हा पाद्री महाशयांच्या गळ्यात एक लाकडी क्रूस होता. वाटेत एक विहीर लागली. बाजूल्या लिंबाच्या भरल्या झाडाखाली शेंदूर प्यालेला एक म्हसोबा, नवस फिटलेल्या वस्तूंच्या गराड्यात, अलिप्ततेने, अंग आखडून विसावला होता.
पाद्री महाशय तरतर चालत म्हसोबापर्यंत आले व शेजारच्या विहिरीत त्यांनी म्हसोबा फेकून दिला. आजूबाजूच्या श्रध्दाळूंना धक्काच बसला. पाद्री महाशयांना प्रचाराची ती उत्तम संधी होती. त्यांनी गळ्यातला लाकडी क्रूस विहिरीच्या पाण्यावर तरंगवला आणि ऐटीने इतरांना म्हणाले, “असला कसला तुमचा देव? जो स्वत:च पाण्यात बुडतो, तो तुम्हाला काय तारणार? ख्रिस्ताची खूण पाहाः ती तुम्हाला तारील. ती तुम्ही पत्करा. “
जणू काही ती खूण पत्करायची, अशा लकबीने पाद्री महाशयांच्या बरोबर आलेल्या अधिकाऱ्याने, क्रूस एका हातात घेतला आणि तो पर्यंत कोणीतरी बुडी मारून काढलेला म्हसोबाही दुसऱ्या हातात घेतला. मग पाहता पाहता लगबगीन अधिकारी पुढे गेले. शेजारीच तीन धोंडे मारून (मांडून) कोणीतरी स्वयंपाक करीत होते, त्यात या वस्तू टाकल्या. लाकडी क्रूस हां हां म्हणता जळून गेला आणि शेंदरी म्हसोबा, वाढत्या ओल्या तेजाने टिकून राहिला. तो जळण्याचा प्रश्र्नच नव्हता.
जमेलेल्यांनी टाळ्या वाजविल्या. पाद्री महाराजांचा चेहरा उतरला. त्यांना बोलायला जागाच नव्हती. प्रथम छेड त्यांनी काढली होती. अर्थात् हा पाद्री म्हणजे काही ख्रिस्ती असहिष्णुतेचे खरोखर रूप नव्हे.. मध्ययुगात व त्या लगोलग, अनेक ख्रिस्ती अत्याचाराने इतिहास तांबडा झाला. पण सर्व ख्रिस्ती काही तसे नव्हते., आणि नसतात. खुद्द ख्रिस्त तर स्वत:चे रक्त सांडून, जगाच्या आदराला पात्र झालेला एक श्रेष्ठ पुरूष होते.
एकॉनॉक्झॅम म्हणजे मूर्तीभंजनाची सरकारी चळवळ आठव्या, नवव्या शतकात यशस्वी होऊ शकली नाही, असे
‘एनसायक्लोपिडिया ऑफ रिलिजन‘ sभाग, सात, पान अठ्ठावनवर लिहिले आहेह. अमिन्ससारख्या चर्चमध्ये चार हजार पुतळे असल्याचा उल्लेख तेथे आहे. व तेथेच म्हटले आहे की हिंदू धर्मात प्रतिमापूजेची कल्पना ख्रिश्र्चनांच्या नंतर आली. ‘
धर्म चांगला असतो. धर्मवेड वाईट असते. ज्ञान चांगले असते. अज्ञान वाईट असते. ही गोष्ट सगळ्यालाच लागू आहे. क्रूस आणि म्हसोबा, पाद्री आणि अधिकारी या दोघांनाही हसत असतील.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView