पहिली उपायकथा: विज्ञान

Date: 
Sun, 6 Jul 2014

समजा, बाबासाहेब सुधाकरवर फार रागावतात. कारण तो आपले टेबल कधी व्यवस्थित ठेवत नाही. वस्तू अस्ताव्यस्त टाकतो, सुधाकरचे बाबासाहेबांवर प्रेम असते. टेबल चांगले लावायला पाहिजे हे सुधाकरला कळतेच. आळसाने त्याच्या हातून तेवढे काम होत नसते. बाबासाहेबांच्या सतत बोलण्याचा परिणाम इतकाच होतो की तो कोडगा बनतो. “बाबासाहेबांच्या रागाकडे दुर्लक्ष करतो. पण त्याला जर तुम्ही सांगाल, ”बाबासाहेबांच्या पोटात गंभीर अल्सर झाला आहे”, तर तो कावराबावरा हाईल, डॉक्टरकडे जाईल. हॉस्पिटलमध्ये खेटे घालेल, एक्स-रे काढून आणण्यासाठी त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन जाईल. ऑपरेशन ठरले तर रात्ररात्र जागेल, रक्तदानाची वेळ आली तर स्वत:चे अर्धे रक्त द्यायलाही तयार होईल.

अशा या सुधाकरला आपल्या अव्यवस्थित टेबलामुळे बाबासाहेबांना अल्सर होईल, असे कुणीतरी वर्षापूर्वी सांगितले असते, तर खात्रीने त्याने टेबलावरची पुस्तके आणि वस्तू व्यवस्थित ठेवल्या असत्या. वूल्फ या वैज्ञानिकाने यावर बोलके प्रयोग केले आहेत. माणूस रागावलेल्या स्थितीत आतड्याचे फोटो घेतले; त्याला दिसले, की आतडी नेहमीपेक्षा फुगलेली होती. सतत रागावणाऱ्या माणसाची आतडी नेहमी फुगतात आणि सतत फुगलेल्या आतड्यात कोठेतरी छोटा विस्फोट होण्याचा संभव असतो. ज्याला आपण ‘अल्सर’म्हणतो. त्या विस्फोटाचे फोटोही वुल्फने घेतले. हे फोटो, हे विवेचन, हे निष्कर्ष बाबासाहेबांना योग्य वेळी वाचावयास मिळाले असते, तर खुद्द बाबासाहेबांनी न रागावता, सुधाकरचे टेबल रोज आवरले असते. त्याची शरम वाटून सुधाकर सुधारला असता. उलटपक्षी सुधाकरने हे प्रयोग प्रथम वाचले असते, तर त्याने बाबासाहेबांना राग येऊन त्याचा परिणाम त्यांच्या अल्सरमध्ये होऊ नये , एवढ्यासाठी तरी टेबल व्यवस्थित ठेवले असते.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView