पार्वती

Date: 
Sun, 1 Jun 2014

वैज्ञानिक अन्वय:’ पार्वती’ह्या नावात मध्यम शक्तीचे प्राबल्य आहे. फक्त मध्यभागी थोडी लघु-लहर तरंग लांबी शक्तीची आणि अंबा या पर्याय नामात तर ह्या प्रखर शक्तीचा लवलेशही नाही. शिवपत्नी, हैमवीत ह्या तिच्या पर्याय नावात मात्र मध्यभागी, पार्वती ह्या नावापेक्षा अधिक प्रखर शक्ती दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काली किंवा दुर्गा या तिच्या अन्य नामात या नामाशी एरवी संलग्न आहे एवढी प्रखर शक्ती नाही.
संास्कृतिक अर्थ: पार्वती ही शंकराची पत्नी. माहेरच मायेची पर्वा न करता शंकरासाख्या गुणी आणि त्यागी रूपाला तिने स्वरूप अर्पण केले. स्त्रीची समर्पणशक्ती, संकटाता सहकाऱ्याला साथ करण्याचे धैर्य, हातात गोळा करून, ती जणू उभी आहे. शंकरात भोळेपणश आणि भीषणता ही दोन टोके आहेत. पार्वतीने ह्याचे अनुकरण सौम्य आणि उग्र रूपे घेऊन केले आहे.

उमा, अंबा, गौरी, हेमवीत हे तिच सौम्य रूप, तर दुर्गा, चंडी, काली, दशभुजा, चामुंडा इत्यादी तिची उग्र रूपे होत. वेळ आली म्हणजे माया सोडून निष्ठूर न्याय देण्याचे प्रतीक म्हणून पार्वतीचे स्थान अजोड आहे.
उपयोग: जीभ, नाक, कंठ, टाळू आणि पोटाच्या खालचा भाग ह्यावर पार्वती नामाचा चांगला उपयोग होऊ शकेला. स्वत:ची माणसे आपल्यावर उलटण्याचे आयुष्यात प्रसंग येतील, तेव्हा कणखर निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा तंटे, बखेडे निर्माण होतील तेव्हा ह्या देवीच्या नामाचा महिमा उपयोगी पडेल. नामोच्चाराबरोबर तिची समर्पणता, निष्ठा, शौर्य, त्यागवृत्ती यांचा आदर होईल, अशी व्रते घ्यावी.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView