पैगंबराची स्वर्ग कथा

Date: 
Sun, 14 Aug 2011

पैगंबराची स्वर्ग कथा
महंमद मुसाच्या समोरूनच वर अल्लाकडे गेले. ते परत येण्याची वाट पहात मुसा बसला. त्याला मोठे कुतूह, होते की महंमद व अल्ला यांचा काय संवाद झाला असेल?
शांत गतीने येणाऱ्या महंमदांना, मुसाने पराकोटीच्या जिज्ञासेने विचारले, “काय सांगितले अल्लाने? मनुष्य जातीला निरोप म्हणून? “

“रोज शंभरदा प्रार्थना करीत जा. पैगंबरांनी धीरगंभीर उत्तर दिले. “
“शंभरदा? रोज रोज शंभरदा? “
“होय.“
मुसा तोंडातल्या तोंडात पुटपुटत म्हणाला, “छे! अशक्य!“
महमंदाच्या पुढे मुसा अजिजीने म्हणाला, “आपण अल्लाकडे परत जा व ही संख्या कमी करून आणा. “
महंमद घुटमळले. शंभर वेळा प्रार्थना करणे त्यांना स्वत:ला काहीच अवघड नव्हते. अर्थात् मुसा पुरतेही ते अवघड नव्हते. प्रश्र्न होता तो सामान्य माणसाचा.
पैगंबर अल्लाकडे परतले. पन्नास टक्क्यांनी कपात करून महंमद परतले. पण मुसाने ती सुध्दा अवघड ठरविली. होता होता महंमदांनी पुन्हा पुन्हा कपात केली. अखेरीला पाच वेळा प्रार्थनेपर्यंत पैगंबरांनी रदबदली करून आणली. मुसांच्या अविश्र्वासाचा स्वर कमी झाला नाही. पण ही आळशी माणसे रोज पाच वेळा तरी नमाज पढतील की नाही कोणास ठाऊक!
घरोघरी मातीच्याच चुली. धर्मोधर्मी आळशांच्याच झुली.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView