ब्रह्म’ नावाची भानगड

Date: 
Sat, 20 Oct 2012

“ब्रह्म ही काय भानगड आहे हो मामा? “ वसंतानं साळसूद प्रश्र्न केला. सर्वात अवघड प्रश्र्नाचं घोंगडं मामांच्या गळ्यात ाकून वसंता मोकळा झाला.
मामा नुकतेच जेवून उठले हाते. हात पुसत त्यांनी प्रश्र्न झटकून टाकला, “तुझा प्रश्र्न हेच ‘ब्रह्म’ आहे, वसंता! “ वसंता चांगलाच बुचक ळ्यात पडला. तो मामांना बुचकळ्यात पाडण्यासाठी गेला आणि स्वत:च तेथे पोहाचला. त्याला वाटलं होतं, फार तर मामा स्वत: वसंताला ब्रह्म म्हणतील. पण विचारलेला प्रश्र्च मामांनी ब्रह्मरूप करून टाकला, तेव्हा हा हल्ला कसा परतावावा, हे काही त्याला कळेना.
पण हे ‘न कळणं’ वादाला परवडणार नव्हतं. म्हणून त्यानं प्रश्र्न रेटला, “हे तुमचं असंत असतं पाहा धर्मवाल्यांचं. सरळ म्हणून काही उत्तर द्यायचं नाही. माझा प्रश्र्नच जर ब्रह्म असता, तर तो मला कशाला पडला असता? माझं अज्ञान हेच ब्रह्म कसं असू शकेल? “
मामा हातपुसणं जागच्या जागी ठेवित म्हणाले, “अज्ञान हे स्वतंत्र नसतं, ‘ज्ञान झाकलेली स्थिती’ हेच अज्ञान असतं.”
“कुणी झाकलं आहे तुमच्या ज्ञानाला? “
“माया” मामा शांतपणाने म्हणाले.
“ब्रह्म झाकण्याइतकी माया मोठी आहे का? आणि एवढं तिचं सामर्थ्य असेल तर तिनं निर्माण केलेलं जग खोटं कसं?”
मामा आपल्या जागेवर बसले. मागे रेलून त्यांनी पाय ताणले, आणि ते पुढे म्हणाले, “मायेची दोन स्वरूपं असतात. एक ब्रह्माला झाकणं आणि दुसरं, खऱ्याचा आभास निर्माण करणं.”
वसंतानं नव्या प्रश्र्नासाठी तोंड उघडण्यापूर्वीच मामानी आपला खुलासा सुरू केला, “तू म्हणजे ब्रह्म आहेस. तुझा प्रश्र्नही ब्रह्म असू शकतो कारण तूच ब्रह्म आहेस. पण तू जेव्हा झोपतोस तेव्हा माया आपलं पहिलं काम करते, म्हणजे तुझी जागृती झोपवते. झोपेतल्या स्वप्नात, तू माझ्यासारख्या गरीबाच्या घरी पाचशे रूपयाची चोरी करतोस, म्हणून तुला पोलिस पकडतात व मग मी येऊन तुला पोलिस कचेरीतून सोडवितो, तेव्हा सुटकेचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतो. हे सगळे सुख-दु:खाचे अनुभव त्या त्या वेळेला तुला खरे वाटणारे - हे मायेचं दुसरं स्वरूप. “
वसंतानं पुन्हा तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. पण मामांनी शेवट रेटला, “ अशा वेळेला तू जागा झालास, तर तुला खऱ्या स्थितीचं ज्ञान होतं, मायेची झाकणं गळून पडतात. खऱ्या जागृतीचं ज्ञान तुला होतं. वात्रटपणाचा प्रश्र्न विचारण्याचा ब्रह्मघोटाळा तू करीत नाहीस. आत्मचिंतनातली शांती हे ब्रह्माचं खरं स्वरूप; ते स्वरूप टाळणारे प्रश्र्न म्हणजे माया. “
वसंताचा प्रश्र्न घशातल्या घशात गिळला गेला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView