सूरदास बेसूर झाले नाहीत

Date: 
रवि, 18 डिसें 2011

कठोर व्रतानं स्वत:च आंधळा झालेला हा मनस्वी भक्त, कुठल्या तरी आर्ताच्या मदतीला धावून जाण्यासाठी, रानातून निघाला होता.
सूरदास आंधळा खरा! पण लोकहिताचं व्रत त्यानं सोडलेलं नव्हतं. पलीकडल्या वस्तीवर, गावाचा कर्ता रोगी झाला आहे, हे त्याला समजलं, तेव्हा सूरदास निघाले. कुणीतरी त्यांना सांगितलं की संध्याकाळचे जाऊ नका. सूरदास हसले. आंधळ्याच्या आयुष्यात, सूर्य सदाचाच पापण्यांनी झाकून घेतलेला असतो.
डोळे गेलेल्या माणसाच्या प्रत्येक अवयवालाच जसे काही डोळे फुटलेले असतात. हाताचं काम करताना, हाताला व चालताना पायाला.
पण धडधडीत डोळस माणूसही नजर असताना चुकता. तर अंधाराच्या पायाचे डोळे कधी अडकले तर नवल नव्हते. सूरदास रस्ता चुकले. जुनाट अशा आडात कोसळले, वर यायला रस्ता नव्हता. असेल तर दिसत नव्हता. एक दिवस गेला, दोन गेले, सात गेले. कृष्ण नामाचं भजन जेवीत, सूरदास जगले. सातव्या दिवशी कोणा अबोल महात्म्याच्या हातानं, सूरदासांना वरची वाट दाखवली. आणि अखेर सूरदास रानापलिकडे पोहोचले.
गावकरी धावत सूरदासापर्यंत पोहोचले आणि विचारायला लागले, “कुठे गेली ती देवाची तेजकाय मूर्ती? जिनं तुम्हाला हाताला धरून आणलेलं आम्ही पाहिलं, तो देव गेला तरी कुठे, पाहता पाहता? “
सूरदास व्याकुळ झाले. डोळे नसल्याचं दु:ख त्यांना पहिल्यांदाच झालं. ज्यानं त्यांना पोहाचवल, त्यांन एक अक्षरही उच्चारलं नव्हतं रेशमासारखा मऊ हात तेवढा असा काही सूरदासांना येथवर घेऊन आला होता.
व्याकुळ झालेले सूरदास कृष्णाला ओल्या आर्ततेने म्हणाल, “कृष्णा, तू माझा हात सोडून गेलास, यात कसली फुशारकी? माझ्या हृदयातून जाण्याचं धाडस तर दाखव. मग मी तुला मोठा म्हणेन. “
बाह छेडाये जाय है
निबल जानि कै माहि।
हिरदै सो जब जाई हौ
मर्द सदौंगो तोहि।।
कशाला रडतोस सूरदास?
कदाचित खऱ्या भक्तापासून दूर होण्याची पाळी आली तर, देवच रडत असेल.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView