ट्रस्ट व संस्था

मनशक्ती संस्थेच्या विश्वस्त संस्था खालीलप्रमाणेः

  • मुख्य ट्रस्ट ‘मनशांती न्यू वे आश्रम’ (रजि. क्र. ई-४३७ पुणे),
  • सह ट्रस्ट ‘मनशक्ती रेस्ट न्यू वे’ (रजि. क्र. ई-५२४ पुणे),
  • ‘हेल्थ न्यू वे’ (रजि. क्र. ई-७३३ पुणे),
  • ‘न्यू वे उद्योगशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट’ (रजि. क्र. ई-३६८२ पुणे)

या चार ट्रस्ट्च्या माध्यमातून ‘मनशक्ती प्रयोगकेंद्र’ सामाजिक कार्य करते.

विश्र्वस्त संस्थांची उद्दिष्टे

- समाजामध्ये जीवनविषयक मूलभूत ज्ञान व शिक्षण यांचा प्रसार करणे, विशेषत: शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर उपयुक्त संस्कारांची शिकवण देणे. ‘न्यू वे’ प्रकाशनातून मांडलेल्या ‘न्यू वे’च्या बुध्दिनिष्ठ तत्वज्ञानाचा परिचय व शिकवण देणे.
- सर्वांच्या सहकार्यााने समाजात सत्कृत्य चक्र निर्माण करणे व त्यागासाठी उद्युक्त करणे.
- स्वामीजींची पुस्तके, लेख, ध्वनीमुद्रित विवेचने संकलित करून छापणे; ती वितरित करणे.
- मनशक्ती मासिक पाठ प्रसिध्द करणे.
- अभ्यासवर्ग घेणे.
- शिबिरे आयोजित करणे.
- चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे.
- समाजहित संबंधित मनोवैज्ञानिक संशोधन करणे.
- वेळोवेळी अनुभवी सल्लागारांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
- आरोग्य व आरोग्य केंद्रांना चालना देणे.
- समाजामध्ये सत्प्रवृत्ती वाढवणे.

भारतातील, पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

View CatelogueView