एकवचनी एकबाणी

Rs.165.00
एकवचनी एकबाणी

एकवचनी एकबाणी
लेखक:- स्वामी विज्ञानानंद
भाषा:- मराठी
पाने:- २२८
देणगीमुल्य:- रू. १६५/- कुरिअर चार्जेस अधिकीचे

‘‘रामाने कणखर विश्वा साने सांगितलं, ‘‘या पृथ्वीवर अनेक राजे आले अन् गेले; राज्ये निर्माण झाली अन् बुडाली. राजपदापेक्षा सत्य आणि ज्ञान मोठं वाटावं एवढी विद्या देणारा माझा गुरु मला जगद्वंद्य आहे. त्याच्या पुढे माझ्या प्राणाची काय किंमत?’’

‘‘सत्य नुसतं ओठात ठेवणार्याज पाप्यांनीच ही पृथ्वी भरली आहे. मला तुझं शाब्दिक सत्य नको आणि तुझा प्राणही नको. मला फक्त एक वचन हवयं. तू तुझ्या आयुष्यात ऐन निर्णयाच्या वेळी पाच वेळा माघार घेशील, असे वचन दे आणि तुझ्या गुरुजींचे प्राण वाचव.’’

‘‘मला असत्य बोलावं लागणार नसेल, असं मी काहीही करीन. मी अवश्य पाच वेळा माघार घेईन. माझ्या गुरुजींच्या प्राणासाठी...’’

शरयू नदी एका डोळ्याने हसत होती, दुसर्याण डोळ्याने रडत होती. शरयुच्या एका तीरावर सुरु झालेला हा शरप्रसंग शरयूच्या दुसर्यार तीरावर काही दशकांनी संपणार होता, हे तिनंही ध्यानी घेतलं....’’

स्वामी विज्ञानानंद यांचे सखोल अनुभवविश्व, उत्कट भावशैली, खटकेबाज व चुरचुरीत संवादांचे कौशल्य, प्रसंगांची व प्रकरणांची उत्कृष्ट मांडणी; सर्व व्यक्तीरेखा अत्यंत स्पष्ट, वर्णने मोजकी पण बोलकी, रम्य अन् प्रभावी; वाचकांमध्ये कथावस्तुविषयी आत्मीयता निर्माण करण्याची जबरदस्त ताकद; वजनदार आणि अर्थाला पक्की असणारी वाक्यरचना, यातून निर्माण झालेली, रामाच्या आयुष्यावरील एक अपूर्व कादंबरी म्हणजे ‘एकवचनी एकबाणी’.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView