... आणि मंगळ रडला

Date: 
Sun, 27 Jan 2013

मंगळाच्या डोळ्याला टचकन् पाणी आलं. किती झालं तरी आकाशच्या विशाल उंचीवर मन मोठं होतंच. मोकळ्या वातावरणात मनही मोकळं होतं. म्हणून नारद जेव्हा मंगळाला त्याच्या नावानं स्त्रियांचे होणारे हाला सांगायला लागले, तेव्हा त्याच्या डोळ्यंना टचकन् पाणी आलं.
नारदांना स्वत:ला काय पृथ्वीवरच्या लोकांनी कमी बदनाम केलं होतं? ‘कळीचा’नारद म्हणून एका ‘कलेच्या’नरप्रेमी श्रेष्ठला त्यांनी हिणवलं होतंच ना? तरीही नारद समजुतीच्या स्वरात मंगळाला म्हणाले, “तुझ्या नावानं सर्रास छळतात असं नाही. जन्मकुंडलीत बारा, एक, चार, सात आणि आठ या स्थळात मंगळ असला तर ती पत्रिका मंगळाची मानतात. आणि नवरा-बायकोच्या दोघांच्याही स्थानी मंगळ असला तर तो शुभ असतो असं मानतात. ‘अग्निर्मूर्धादिव: ‘या मंत्राचा दहा हजार जप केला तर मंगळाचे दुष्परिणाम कमी होतांत, त्याच्याबरोबर सोनं, प्रवाळ, रक्तवस्त्र, गूळ लायक गरीबांना द्यावं, असंही शहाणे लोक समजतात. “
सूर्यानं मध्येच डिवचलं. तो म्हणाला, “ नारदमुनी, आपण खरं सांगा. पृथ्वीवरचे लोक मंगळाला आळशी समजतात. आळस करण्याला टंगळ’मंगळ’सुध्दा म्हणतात. मंगळामुळे युध्दं होतात असं समजतात. त्याला रागीट म्हणतात. “
मंगळ उसळून म्हणाला, “मी काय रागीट आहे? माझा रंग अंमळ लालसर दिसतो, म्हणजे मी काय रागीट आहे? “
रागीट माणूस रागीट म्हटल्यावर जेव्हा रागावतो तेव्हा निर्माण होणाऱ्या परस्पर विरोधानं नेहमीच खसखस पिकते. तसे आजूबाजूुचे ग्रह मनातल्या मनात हसायला लागले.
मंगळ ठसक्यात म्हणाला, “गणपती हा तुम्ही बुध्दीचा देव समजता ना? त्याचं माझ्यावर केवढं प्रेम आहे? ज्याला गणपतीची मर्जी संपादन करायची असेल त्यांनी मंगलमूर्तीची पूजा मंगळवारीच करावी, असं कशाला सांगितलं असतं? मंगळवारी संकष्टी चतुर्थी आली म्हणजे अंगारकी म्हणून तिला विशेष कशाला मानलं असतं लोकांनी? “
नारद म्हणाले, “तुला अमंगल समजण्यात आणि तुझं नाव मंगळ आहे हे मान्य करण्यात आपण स्वत:चीच भाषा खोडून काढतो आहोत हेसुध्दा माणसांना समजत नाही. लोकांच्या अज्ञानाला तू कशाला रागावतो आहेस उगीच? शिया परेरी माणसाचं तुझ्यावर खूप प्रेम.
त्यानं तुझ्यातलं पाणी पाह्यलं. अमेरिकेतल्या डॉक्टर लॉटल यानंही तुझ्यातलं पाणी जोखलं. तुझ्यात निदान पूर्वी तरी ‘माणूस’की आहे अशा श्रध्देने काही लोकांचा शोध चालू आहे. “
रागीट माणूस थंड झाला म्हणजे सहानुभूतीच्या थंडाईनं विरघळतोच. मंगळाच्या डोळ्याला पुन्हा एकदा पाणी आलं.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView