आमेन’चा दुसरा अर्थ

Date: 
Sun, 8 Mar 2015

पुरावा क्रमांक 37: ‘आमेन’चा दुसरा अर्थ
‘आमेन’ चा एक अर्थ क्र.पस्तीसमध्ये आपण पाहिला. ख्रिस्ती पुराणातील रेव्हेलेन तीन, कडवे चौदामध्ये आमेन हा ख्रिस्ताच्या पदवीसारखा वापरला आहे.

पुरावा क्रमांक 38: ओहरमज्द
पारशी म्हणजे झोराष्ट्रीय धर्मात सर्वेश्वराचे नाव ‘ओहरमज्द’ असे आहे. अहूरमज्द असोही त्याचा उच्चार आहे. अहम् आणि अहमी या शब्दाबद्दल आपण पूर्वी चर्चा केली आहे. अहूरमज्दमधीला ओमचे नाते स्वयंसिध्द दिसते.

पुरावा क्रमांक 39: अम्माह
बायबलमध्ये अम्महा हा शब्द आहे. ऍमा असाही त्याचा उच्चार होऊ शकतो. त्यात ‘ह’ हा पुष्कळदा सुप्त असतो. म्हणजे त्याचा उच्चार स्पष्ट होत नाही. यात आपण ओमच्या निकट येतो.

पुरावा क्रमांक 40: गॉस्पेलमधील ‘अँमा’
एकूणचाळिसाव्या पुराव्यात ऍमॉह हा शब्द आपण पाहिला. मार्क्सच्या गॉस्पेलमध्ये अखेरच्या अध्यायात 34-35मध्ये ख्रिस्ताचे शेवटले शब्द आहेत, “इलोई, इलोई, लामा सबास्थानी” म्हणजे, “देवा, देवा रे! तू मला का सोडलेस्य? “ त्यापैकी मूळच्या उद्गारात, ओम आणि ऍम यांचा उपयोग स्पष्ट आहे. या संदर्भाखाली जी तळटीप आहे, त्यात ऍमचा अर्थ ‘आध्यात्मिक माना’असा दिला आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView