उम्
पुरावा क्रमांक 20:
उम्
‘उम् ‘हे पद शब्दाच्या आधी जोडले जाते. उदा. उमक्लिप् (Umclip) याचा अर्थ घट्ट धरून रहाणे असा होतो. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, बहुतेक तज्ज्ञांच्या मते इंग्लिश भाषा ही
मुख्यत: अँग्लो-सॅक्सन भाषेतून निर्माण झाली. तसे करताना जुन्या बोलीभाषेतील अधेमुर्धे शब्द बदलले. इंग्लिश भाषेतील जवळजवळ अर्धे शब्द फ्रेचं आणि लॅटिनमधून आले आहेत. तरीसुध्दा अँग्लो-सॅक्सनचा पगडा इंग्लिशवर भरपूर आहेच. जर्मन, डच, स्वीडीश, डॅनिश, इत्यादी भाषेप्रमाणे तीही टुटॉनिक भाषेचा भाग आहे. या भाषेवर भारतीय भाषा प्रभुत्वाचा अप्रत्यक्ष अंमल आहे. म्हणून त्यास तज्ज्ञ ‘इंडोयुरोपियन’ अशी संज्ञा देऊ लागले. भाषेत सतत बदला होतात. तसे प्रचंड प्रमाणावर बदल होऊनसुध्दा काही मुळे कायम राहिली. ॐचे मूळ बळकट राहिले आणि या ना त्या स्वरूपात जगभर तग धरून ॐने जगाला पोषण दिले.
एखादी रचना विश्वव्यापी आहे, ही एक बाजू झाली. पण ती उपयुक्त आहे असे ठरले तर विश्वव्यापित्व शोभून दिसते. त्या दृष्टीने अगणित पिढ्यांना आणि लोकांना ओंकाराने शांती आणि यश दिले आहे. हा प्रत्यक्ष अनुभव, पुराव्याचा एक महत्त्वचा भाग आहे.