कडेलोटाच्या पलीकडे

Date: 
Sat, 18 Feb 2012

तुम्हाला एक भाग माहीत असेल. दुसरा माहीत नसेल. चिलयाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल. पण त्याचा उत्तरार्ध तुम्हाला माहीत असेलच असे नाही.
श्रियाळ आणि चांगुणा या पतीपत्नीकडे देव परीक्षा पहायला आला. आणि त्याने सरळ मुलांचे मांस मागितले. अनेक अटीही घातल्या. चिलयाला म्हणजे स्वत:च्या मुलाला चांगुणेने उखळात घालून कांडायचे. त्याच्या रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना रडायचे नाही. कांडलेला तो मुलगा आईने शिजवायचा. आणि बापाने पाहुण्याच्या रूपाने आलेल्या देवाच्या पंक्तीला बसून, स्वत: मुलाचे मांस मुक्तपणे खायचे. अशा बेबंद अटी चांगुणेने पत्करल्या होत्या. अतिथीला संतुष्ट करण्याची संस्कृतीच होती ती येथवरची कथा बहुतेकांना माहीत असेल. पण उरलेली कथा बहुतेकांना माहीत असेलच, असे नाही.
म्हणजे त्याचे असे झाले, की ठरल्याप्रमाणे चिलयाला उखळात घालून कांडला. शिजवला. इतके झाल्यावर पंगत बसायची वेळ आली.
सर्व मार्गात भक्ती सोपी असे म्हणणाऱ्या महाभागांच्यापर्यंत भक्तीच्या सगळ्या व्याख्या पोहोचलेल्या नसतात. इतक्या खोलात कोणाला जायचेच नसते. श्रियाळावर तर याहीपेक्षा घोर प्रसंग कोसळावयाचा होता. पंगत बसण्याच्या क्षणाला तो कझाकी पाहुणा ताडकन् उठला आणि दरवाजाकडे निघाला. राणी पुढे झाली. राजा धावला. कारण पाहुणा आता नाराज का हे त्यांना कळेना. दारापर्यंत पोहोचल्यावर कडव्या कठोरतेने म्हणाला, ‘मी येथे मुळीच अन्न घेऊ शकत नाही. जो यजमान निपुत्रिक आहे., त्याच्याकडे अन्न कसे घेणार? “
पहा कसा उफराटा न्याय होता तो! श्रियाळ निपुत्रिक झाला तो पाहुण्यामुळे. पुन्हा पाहुणाच गुरगुरला की निपुत्रिकाकडे जेवणार नाही म्हणून.
राजा-राणी कोसळून पडल. आणि भक्तीचा एवढा कडेलेाट पाडल्यावर पाहुण्याचा स्वर मृदू झाला. तो म्हणाला, “खाली पडायला काय झालं? आम्ही निपुत्रिक नाही, असं साफ सांगा, म्हणजे झालं. थांबा मीच हाक मारता, चिलयाला, येरे ये चिलया. “
बस्स!! पलिकडच्या दालनातून चिलयाची दुडदुड पावले धावत आली. भक्तीची कराल परीक्षा उतरल्यावर समोर खडे उभे राहते समाधानेच सौंदर्य फूल. पण भक्तीच्या सोपेपणाविरुध्द आवर्जून दिलेले इशारे, सोपे आणि स्वस्त समाधान मानणाऱ्यांना दिसले मात्र पाहिजेत.्र
पायात कुसळ टोचल्यावर “अरे देवा” अशी देवाची आठवण काढणारा मनुष्य त्याचा भक्त होऊ शकत नाही. डोक्यात मुसळ पडो की प्रकाश पडो, ते पडणे ही रास्त परीक्षा समजणारा, खरा भक्त असतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView