गुरूवारचा दत्तप्रसाद

Date: 
Sun, 10 Feb 2013

गुरूला पृथ्वीवर मोठा मान आहे. ही माहिती नारदानं सांगितली तेव्हा, अवाढव्य गुरू खूष होऊन गेला. ज्याच्या त्याच्या शक्तीचं साफल्या पाहिलेलं ज्याला त्याला आवडतंच.
पण बुध गमतीनं म्हणाला, “मोठ्यांचा मान आणि छोट्यांना लाथ, ही माणसाची रीतच आहे. रोज उपयोगी पडणारं गुरू लाथा मारत गोठ्यात बांधायचं, आणि भल्या मोठ्या दिसणाऱ्या गुरूपुढे थरथर कापत, त्याला भ्यायचं. यापेक्षा भित्री माणसं, दुसरं काय करणार? “
आकारानं सगळ्यात लहान असलेला बुध निंदा करतो आहे की काय, अशा आशंकेनं गुरू बुधाकडे डोळे मिचकावून पाहू लागला. पण तेवढ्यात नारदांनी त्याच्याबद्दलचं आगमसारात असणारं वर्णन आणि स्तुतीमंत्र सांगितला,

“गकार: सिध्दिद: प्रोक्तो रेफ: पापस्य हारक:।
उकारो विष्णुख्यक्तस्त्रितयात्मा गुरू पर:।।

(अर्थ - गुरू शब्दातला गकार हा सिध्दी देणारा, रकार हा पापहारक व उकार हा अव्यक्त विष्णू आहे. एवंच गुरू हा वरील तिन्ही गोष्टींचा समावेश असलेला व श्रेष्ठ आहे.)
गुरूनं बुधाला समजावलं, “मी आकारानं मोठा आहे म्हणून स्वत:ला मोठा मानत नाही. माझ्या वारी दत्ताला मोठेपण मी आपण होऊन दिलं आहे. दत्त म्हणजे देणारा. स्वत: लंगोटीभर वस्त्र लावून, क्षुद्र वस्तूतसुध्दा चोवीस गुरू शोधणारा, असा त्यागी, गुणवान आदर्श पूजावा, म्हणजे माणसाचं कल्याण होइले, असंच मला वाटतं.”
नारदानी माहिती पुरवली, “मुसलमान लोकसुध्दा गुरूवारला शुभ मानतात. मूल गुरूवारी जन्मलं तर ते यशवान समजात. त्याला ‘जुमान राती सय्यद’समजात. “
बुध गुरूच्या पायाला गुदगुल्या करून म्हणाला, “उगीच तुझ्या पायाला गंमत केली रे. दत्तासारख्या त्यागी चेतनाला मोठं केल्यामुळे तू मोठा झाला आहेस, हे मला काही समजत नाही का? मी तुझ्याजवळ आहे. दूर दूर असलेल्या माणसांनी खोट्या आणि सोप्या गुरूकृपेबद्दल भलते ग्रहे करून घ्यायचे आणि आपल्यासारख्याच्याबद्दल विक्षिप्त ‘ग्रह’ बनवायचे, यात आपली चूक काय आहे? या माणसांना शहाणं कोण करणार? “

“तेच करण्याचा माझा नम्र प्रयत्न आहे. “नारद उठून उभे राहण्याच्या पवित्र्यात म्हणाले. पण सगळ्याच ग्रहांनी केलेल्या आग्रहानं; पृथ्वीवर जाण्यापूर्वी थोडावेळ बसायचं,म्हणून पुन्हा बसले.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView