गेल्या महायुध्दातील कौरव पांडव एक विलक्षण योगायोग

Date: 
Sun, 19 Oct 2014

31 डिसेंबरची रात्र. न्यूयॉर्कमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर एक इंग्लिश व्यक्ती टॅक्सीतून उतरली. क्षणभर थांबून डावीकडे पहात, ती व्यक्ती रस्ता ओलांडू लागली. तेवढ्यात एक ट्रक भरधाव आला आणि त्याखाली ती व्यक्ती चिरडली जाणार, इतक्यात ड्रायव्हरने ब्रेक लावले. तरीसुध्दा त्या व्यक्तीला ट्रकाचा धक्का लागलाच. आणि व्यक्ती दूर फेकली गेली.
ट्रक ड्रायव्हर मारियो कॉन्टासिनो याने पोलिसांच्या सहाय्याने त्या जखमी व बेशुध्द व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले की, त्या व्यक्तीचा हात मुरगळला असून चेहऱ्यावर अनेक ठिकाणी खरचटले आहे. पण ही व्यक्ती कोण? हे जेव्हा डॉक्टरांना कळले, तेव्हा मात्र ते दचकले. कारण ती व्यक्ती म्हणजे इंग्लंडहून अमेरिकेत आलेला बडा पाहुणा होता. त्याची त्वरित स्पेशला वॉर्डमध्ये व्यवस्था करण्यात आली. आणि त्याच्या पत्नीला अपघाताची वार्ता कळवून बोलावण्यात आले.

दुसऱ्या दिवशी हा पाहुणा शुध्दीवर आला आणि बिछान्याशेजारीच उभ्या असलेल्या ट्रक ड्रायव्हरला म्हणाला, “चूक माझीच होती. “एवढे शब्द उच्चारल्याबरोबर त्याला पुन्हा ग्लानी आली. चूक खरोखरच त्याची होती. कारण अमेरिकेत वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने धावतात, ही गोष्ट त्याच्या लक्षता राहिली नव्हती. आणि त्याने डावीकडे पाहून रस्ता ओलंाडण्याचा प्रयत्न केला आणि तो अपघात झाला.
हा इंग्लिश गृहस्थ चांगलाच धडधाकट असल्याने, लवकरच तो बरा झाला. एवढा मोठा धक्का लागूनही शरीरातील एकही हाड मोडलेले नव्हते. पाचव्याच दिवशी तो बिछान्यावर उठून बसू लागला.
आठच दिवसांनी तो हॉस्पिटलबाहेर पडला. त्या दिवशी वर्तमानपत्रांनी त्याच्या खुशालीची बातमी छापली. आणि गम्मत म्हणजे

त्याखाली दुसरीही एक बातमी होती. जर्मनीतला एक उदयोन्मुख तरूण राजकीय पुढारी मोटारने प्रवास करीत असताना, निसरड्या रस्त्यावरून ती मोटार घसरून दुसऱ्या मोटारीवर वेगाने आदळी. पण त्या जर्मन तरूणास मात्र बोटाचे एक हाड मोडल्याव्यतिरिक्त काहीच झाले नाही.
तो ब्रिटिश पुढारी आणि जर्मन पुढारी सुदैवाने मरणातून वाचले खरे, पण नियतीची इच्छा जणू दुसरीच होती. कारण पुढे आठच वर्षांनी हे दोघे पुढारी एकमेकांचे शत्रू म्हणून एकमेकांवर तुटून पडले. आणि त्यापैकी एकाला मृत्यू जवळ करावा लागला. ती इंग्लिश व्यक्ती म्हणजे विन्स्टन चर्चिल आणि तो जर्मन तरूण म्हणजे ऍडॉल्फ हिटलर.
- आधारित

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView