घोड्यांसाठी लढाई थांबली

Date: 
Sat, 25 Feb 2012

अर्जुन कृष्णाकडे पहातच राहिला.
पाहील नाही तर काय करील? कृष्णाचच सांगण्यावरून अर्जुन कौरवांशी घोर युध्द लढत होता. गीतेची स्फोटक स्फटिक वापरून कृष्णाने अर्जुनाला कौरवांच्या विरुध्द उभे केले होते. संगर सुरू झाला. अठरा अक्षौहिणी विरुध्द अकरा अक्षौहिणींचे झुंज सुरू झाले. एकेक अक्षौहिणी म्हणजे सव्वा दोन लाख डोकी.
द्वेषाने पेटलेली ही लक्षावधी डोकी कोट्यावधी अस्त्रांनी परस्परांना नष्ट करण्यासाठी झुंजत होती. रक्ताचे पूर वहात होते. मांसाचा चिखल. हाडांच्या टेकड्या.
युध्द उन्मादाला आले होते. कृष्णाने मध्येच अर्जुनाला थांबायची खूण केली होती. त्याने स्वत: रथ थांबवला होता. प्रत्यंचावर चढलेला तीव्र शर आवरून अर्जुनाच्या भिवयांनीच प्रश्र्न केला की का म्हणून थांबायचं?
कृष्णाने खेचलेला लगाम थोडा सैल सोडून खाली उतरत म्हटले, “घोड्यांच्या तोंडाला फेस आला आहे पहा! घोडे दमलेत. “
आता अर्जुन चांगलाच चिडला. तो चकितही झाला. तिकडे लक्ष न देता कृष्णानं अर्जुनाला खड्डा खणायला लावलं त्यातून पाणी झिरपलं, घोड्यांना पाजलं. त्यांची सेवा केली.
घोडे पाणी पीत असताना छातीला हाताची घडी घालून कृष्ण निर्भयतेने इकडे तिकडे पहात होता. “जसा काही तो स्त्री-समुदायातच उभा होता, असं त्याच्या उभं राहण्याचं वर्णन, द्रोणपर्वात, नव्याण्णवाव्या व शंभराव्या अध्यायात मिळतं. गोपींच्या गराड्यात असल्याबद्दल कृष्णाची अवहेलना करणाऱ्यांना इथं धडा मिळेल की कृष्णाला गोपींच्या शरांची भीती नव्हती कारण त्याला शत्रूंच्या शरांचीही भीती नव्हती. तो सुखदु:ख समभाव होता.

ही हकिगत संजयच्या तोंडून ऐकताना धृतराष्ट्रानं कृष्णाच्या निर्भयतेचं रहस्य विचारलं. तेव्हा संजय म्हणाला, “हा सगळा महिमा परोपकाराचा आहे. “
धृतराष्ट्र परोपकारच्या कल्पनेलाच बहिरा होता. तसा तो नसता, तर कदाचित युध्दही टळलं असता.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView