चूक केली, कबूलही केली

Date: 
Sat, 29 Oct 2011

बर्फाची शिखरे पांघरून, शिवशंकर हिमालयाच्या आढ्यावर बसले होते. ढगांच्या तक्क्यावर त्यांची मान पहुडली होती. आणि साहजिक पलीकडे धवलगंगा स्त्रवत होती. शिवजींचे डोळे किलकि ले होते, अर्थात् तिसरा नेत्र मिटलेलाच होता.
शिवगण ज्या पिप्पलादाची वाट पहात होते तो आला.
तपाने कृश झालेला, पण बळकट मनाचा, स्थिर चालीचा पिप्पलाद.
एकेक पाऊल पुढे टाकत श्रीशंकराच्या चरणाशी आला. हात जोडून उभा राहिला.
“काय इच्छा आहे? “गडगडत्या आवाज श्रीशिवांनी विचारले.
“मला एक राक्षसी हवी आहे. राक्षसी की जी सर्व देवांना ठार मारून टाकील. “ पिप्पलादाच्या डोळ्यात अंगार उसळत होता. मिटल्या मुठीत तो जणु देवांना चिरडून टाकत होता.
पिप्पलादाच्या संतापाला कारण नव्हते असे नाही. देवांच्या विजयासाठी हाडे काढून देणारे दधिची त्याचे वडील. जेव्हा दधिचींनी हाडे हाडे काढून देण्यासाठी देहत्याग केला, तेव्हा तो आईच्या पोटात होता.
गव्हस्तिनीला दधिचींच्या देहांतराची बातमी कळली तेव्हा ती सरळ पिंपळाच्या झाडाआड गेली. पोट चिरून गर्भ पिंपळाच्या झाडाखाली ठेवला व ती उरलेल्या देहासह सती गेली. मग पिप्पलादाला वाढवला तो पशुपक्ष्यांनी. पिप्पलादाला त्या पिंपळवरच्याच सोमाने विद्या शिकवल्या आणि शनीने आपल्या माता-पित्यांच्यावर हा आकांत ओढवला अशा समजुतीे पिप्पलादाने शनीला खाली पाडाले. शनी शरण आला तेव्हा बारा वर्षाच्या आतल्या मुलांना मारायेच नाही या अटीवर शनी सुटला. म्हणून पिप्पलादाचे स्मरण केले की शनीपिडा होत नाही, असे म्हणतात.
आणि हा पिप्पलाद, मातापित्यांच्या अभिमानाने, त्यांच्यातर्फे देवांचा सूड घेण्यासाठी शंकराची आराधना करायला लागला. तप पुरेसे झाल्याव त्याचे फळ तपकर्त्याच्या पदरात टाकायचे हा शंकराचंा बाणा आणि म्हणूनच त्यांच्यासमोर त्यांनी पिप्पलादाला येण्याची परवानगी दिली.
दधिचींची हाडे वापरून देवांना विजय मिळाला. पण दधिचींचा हा मुलगा किल्मिष भरलेला होता. देवांनी आपल्या पित्याला मारले, हा डंख घेऊन त्याने केलेले तप शंकरांच्यापर्यंत पोचले होते. शंकरांना पिप्पलादाच्या हवाली त्याच्या तपाचे फळ करावे लागले. त्यातून पिप्पलादाने देवांचा सूड घेण्यासाठी राक्षसी निर्माण केली.
ती राक्षसी
निर्माण झाल्याबरोबर पिप्पलादाच्याच मागे लागली. ती म्हणाली, “देवांना मारण्याच्या कामी तुझे पुण्य तू खर्च केलेस तर प्रथम तुलाच मारले पाहिजे. कारण तुझ्या डोळ्यात सूर्य आहे. कंठात सरस्वती देवी आहे.. “
राक्षसीची झेप वाचवण्यासाठी पिप्पलदा पळत सुटला. पळत्या पायांना शहाणपण असते. त्याने आपली चूक कबूल करायचे ठरवले. पुण्वान पित्याला उतावळ्या, सद्‌वृव पिप्पलदाने डाग आणू दिला नाही.
पळत्या पायातले शहाणपण ते पाय पकडून धरून ठेवले तरी माणसाचे कल्याण होते.
पळते पाय कोठे थांबवावेत हे पिप्पलादाला बरोबर माहीत होते. पुन्हा तो शंकरांच्या पायाशी येऊन थांबला.
धापा टाकलेल्या पिप्पलादाला काही बोलावेच लागले नाही. त्याचा प्रत्येक आर्त अवयव शंकरांना विनवत होता, “मला वाचवा. मला वाचवा. “
शंकरांनी त्रिशूळ उंच केला. राक्षसी धुक्यात विरून गेली. पिप्पलादाचा सूडही विरून गेला. ज्ञान जागे झाले होते. अर्थववेदाच्या एका शाखेचे पुढे त्याने प्रवर्तन केले. त्यालाच ‘पिप्पलदा शाखा’ म्हणतात.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView