छोटी आकृती, मोठी कृती

Date: 
Sat, 8 Sep 2012

दंडाने कमावलं असेल, ते हिसकले जाण्याचा दंड, जगाच्या राज्यात होतच असतो. तसा तो असुरांना होण्याची वेळ आली होती. त्यांना विजय मिळाला होता. भृगुकच्छ म्हणजे नर्मदेच्या उत्तर तीरावरचं आजचं भडोच शहर. ते शहर बळीनं मांडलेल्या यज्ञासाठी सजलं होतं. देवांच्यावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी, पक्का करण्यासाठी, यज्ञातलं भजन साकार झालं होतं.
वास्तविक असुरांनी देवांचा पराभव केला. देवांनी युध्द गमावलं होतं. ते त्यांना वामानाचं रूप पुढे करून, कपटानं परत मागायचं होतं. वामन या गोष्टीला कबूल झाल तो एवढ्यासाठी, की मुळात दैत्यांनी मिळविलेला रणांगणावरचा विजय हाच कपट आणि कुटिल हेतू, या दोन पापांतून निर्माण झालेला होता.
विष्णूचे अजवरचे चार अवतार उत्क्रांतीदर्शक होते. तसाच हा पाचवा अवतार. मासा, कासव, जंगली वराह, आणि अर्ध मानव, अर्ध सिंह. या चार पायऱ्या ओलंाडून आत महान मानवाच्या निराळ्या रूपाकडे विष्णूच्या अवताराचं पुढलं पाऊल पडत होतं. डार्विननं पुराणकथा लिहिली असती, तर ती अशीच सजली असती.
विष्णूचा वामन अवतार हा, कश्यप आणि आदितीचा मुलगा म्हणून, निर्माण झाला. केशवतोषण नावाचं व्रत कश्यपाला करावं लागलं. अवताराचं निमित्त व्हायला मिळणं, हे काही साधं पुण्य नव्हे. याच दृष्टीने वामनासारखा पूर्ण मानव अवतार कश्यपाच्या पोटी आला. आणि दैत्यांच्या तावडीतून मानवजातीला सोडवलं.
वामनाचा जन्म भाद्रपद शुध्द द्वादशीच्या दिवशी श्रवण नक्षत्रावर अभिजात मुहूर्तावर झाला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView