छोट्या ‘गोष्टी’ने अमृतकुंभ कोरडे

Date: 
Sat, 24 Nov 2012

मोहिनी नटून थटून दैत्यांच्या समोर उभी राहिली, तेव्हा दैत्य, मिळालेलं अमृत पिण्यासाठी एकत्र जमले होते.
केवढ्या खटाटोपानं ते अमृत दैत्यांना मिळवलं हातें, ते त्यंाचं त्यांनाच ठाऊक! अजून वाटणी तरप ुरी झाली नव्हती. देवही समोर होते. पण अमृतावर जवळजवळ त्यांचा ताबा आला होता. दैत्य अमर झाले असते, तर देवांचं मरण ओढवलं असतं. ज्याना अमृत प्यायची इच्छा होती त्यांचा अनेकदा दैत्यांनी पराभव केला होता, ते काही उच्च कोटीतले देव म्हणता येणार नाहीत. त्याना ‘महा’देवाची पातळी नव्हती. कौरव-पांडवांइतकाच फरक. कौरव दुष्ट होते. पण पांडवही काही साधेसुधे साळसूद नव्हते. भीम आणि अर्जुन, नकुल आणि धर्मराज, अर्जुन आणि धर्मराज यांच्यातले कितीतरी समर प्रसंग इतिहास तुम्हाला संागेल. “दगडापेक्षा वीट मऊ” इतकाच “कौरवांपेक्षा पांडव बरे” म्हणण्याचा न्याय. दैत्य आणि देव तसेच देव आणि महादेव यात हा फरक नसता, तर देवांच्या मदतीला शिव किंवा विष्णू यांना वारंवार जावं लागलं नसतं.
आता पाळी विष्णूची होती.
काही करून अमृत दैत्यांच्या घशाखाली जाऊन चालणार नव्हतं. बेहत्तर आहे स्त्रीचं रूप घ्यावं लागलं तरी! अशा निश्र्चयानं विष्णू उठले आणि त्यांनी स्वत:भोवती मोहिनीरूप गुंफलं.
इतकं सुंदर, की आरशात पाहिलं असतं, तर स्वत: विष्णूच हरखून गेले असते. केतकीचा वर्ण, आरस्पानी डोळे, डोक्यावरून काळा धबधबा खाली सुटावा तसे केस.
मोहिनी ठुमकत पुढे आली, तेव्हा दैत्यांचे चित्त चळलं. दुष्ट असले तरी, एकाग्र सामर्थ्य हीच त्यांची ताकद होती. ते चळवण्याचे काम मोहिनीने केले. दैत्यांचंं लक्ष अमृतावरून अमृतमोहिनीवर गेलं.
पुष्कळदा पाप तुमच्यासमोर नटून ‘मुरडून’ येतं, त्या मागोमाग पापाचा परिणाम तुमच्या पोटात ‘मुरडून’ येतो, तो आतून येतो. माणसाचं वागणं आतबाहेर असल्यानं, बाहेरच्या नटण्यामुरडण्याचा परिणाम, आत पोटातल्या मुरडण्यावर होईल, नाहीतर काय होईल?
त्यामुळेच दैत्यांच्या पोटात अमृत जाऊ शकलं नाही. ते देवांनीच लांबवलं. बिचाऱ्या दैत्याच्या नशिबात खोटी मोहिनी येणार नव्हती. खोट्या मोहिनीपायी खरं अमृत गमवायची चाल माणसांनी दैत्यांपासूनच उसनी घेतली आहे, पण मोहिनीमंत्राची पथ्य विसरण्याजोगी नसतात.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView