जैन प्रतीकाची ताकद

Date: 
Sun, 30 Dec 2012

आकाश ठेंगणं करणारी गोमतेश्र्वराची ती भव्य मूर्ती उभी होती. आणि त्यांच्यापुढे अंगठ्याएवढ ा दिसणारा राजा उभा होता.
राजाचं नाव चामुंडराय. दोन हात उंचीचा चामुंडराय आणि वीस हात उंचीचा गोमटेश्र्वर. एवढी मोठी मूर्ती घडविल्यावर जणु काय आपणच दोनशे हात उंच झालो, अशा दिमाखानं त्यानं आजूबाजूच्या दरबारी दिवाणांच्याकडे पाहिलं.
एवढी मोठी मूर्ती घडवली, तर तिच्या पहिल्या स्नानाल पाणी कसं वापरायचं? दुधाचे हंडेच्या हंडे आणले.
फुशारकीनं फुलून गेलेला चामुंडराय दिवाणाला म्हणाला, “करा सुरू अभिषेक.”
हंडे वर चढू लागले. एका मागून एक. जैन धर्माच्या त्यागवृत्तीचं ते महाप्रतीक दुधात अभिषेकत राहिलं. एकदा सर्व मूर्ती दुग्धामृतानं भिजली, की पूजेच्या पूर्ततेला सुरुवात झाली असती. पण काय झालं होतं कुणास ठाऊक!! वरून पडणाऱ्या दुग्धाच्या हत्तीधारा गोमटेश्र्वराच्या गुढघ्याखाली कोरड्या होत. एक थेबही खाली येत नसे.
चामुंडरायानं दुग्धाचं प्रमाण दुप्पट केलं. तिप्पट केलं. वरून येणरी दुधाची नदी गुढघ्यावर उसळून बाजूला पडे, पण तो दुग्धनद गुढघ्याखालची मूर्ती भिजवेना. शेकडो सेवक थकले. जमवलेला बहुतेक दूधसागर कोरडा पडायची वेळ आली.
राजमंचकापासून दूर एक गरीब म्हातारी राजाकडे चालत आली. पाय लटपटत होते. हात थरथरत होते. हातात एक पोखरेलेलं फळ होतं आणि त्या कोरड्या फलकवचात थोडंसं दूध.
“कसलं फळ आहे, म्हातारे? “ राजा म्हणाला.
“गुळ्ळकायीचं.”म्हातारी कापऱ्या स्वरात म्हणाली, “मी ओतून पाहते दूध. “
राजा हसला. एवढा दुधाचा महापूर कोरडा पडला, तिथं या म्हातारीचं बुटकुलं काय करणार? म्हाताराची विनंती ‘नाही’म्हणायच्यासुध्दा लायकीची नाही, अशा आविर्भावात राजानं नाक उडवलं.
म्हातारीनं तीच पडत्या फळाची आज्ञा मानली. आणि गुळ्ळकायीचं फळ-भांडं गोमटेश्र्वराच्या माथ्यावर रिकामं करण्यासाठी वर पोचली.
राजा हताश नजरेनं वर पाहात होता. थोडेसे हंडे उरले होते, ते वर चढवण्याचं काम चालू होतं. आशेला जागाच नव्हती, आणि म्हणूनच राजाचे निराश डोळे मूर्तीच्या गुढघ्यापाशी रेंगाळत होते. पण त्याला एकाएकी दुधाची धार गुढघ्याखाली येताना दिसली. वर पाहिलं, तर म्हातारी शेवटचे थेंब रिकामे करताना दिली. राजा आवाक् झाला.
त्यानं हात जोडले. गडबडीने मंचकाखाली तो उतरला. आणि म्हातारीला पालखीतून खाली आणायचा हुकूम दिला.

कोण येणार पालखीतून? पद्मावतीचं ते रूप, चामुंडरायाचा अहंकार घालवण्यापुरतचं म्हातारं झालं होतं, महत्तर झालं होतं. देवापेक्षा स्वत:चा अहंकार उंच करणारा फजित पावत असतो. देवाचा उपयोग स्वत:चा अहंकार घालविण्यासाठी असतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView