झाडाचं प्रेम पुराणापासून

Date: 
Sat, 15 Dec 2012

कुठून आणलीस ही नवी तपकीर? पण तू काही म्हण शिंका येऊन नाक वाहात होतं, ते साफ थांबलं.” वसंता खुषीत म्हणाला.
वसंताची बायको खसखसून हसली. ती कुठली तरी मासिक वाचत बसली होती, ती वसंताला म्हणाली, “तपकीर कसली डोंबल्याची? ज्या तुळशीची तुम्ही नेहमी टिंगल करता तिची वाळलेली पानं कुटून डबीत भरून ठेवली होती. तिनं तुमचं पडसं थंाबवलं. आपल्या पूर्वजांना तुम्ही सर्रास शिव्या देत असता. त्या पूर्वजांनीच सांगितलेल्या बहुगुणी तुळशीचं ते पुण्य आहे. “
कोपऱ्यातल्या खुर्चीवर मामा बसले होते. वसंताला वाटलं, की मामा आता आपली चेष्टा करणार. पण मामा खाकरलेसुध्दा नाहीत. त्यांनी आपलं खरंखोटं वाचन चालूच ठेवलं. वसंतानं आपला हल्ला दुसऱ्या मुद्यावर वळवला, तो म्हणाला, “अगं, वनस्पतीचे उपयोग तसे असतातच. मी जो हसतो तो ते त्या तुळशीची पूजा करायला. रोज तू झाडपाल्याला नमस्कार करतेस, मंत्र पुटपुटतेस त्यामुळे तुळशीत गुण असतो तेवढं मला पटत नाही.

ती वाचत होती. ते हातातलं मासिक नाचवीत पद्मा म्हणाली, “हे पहा, तुमच्या रशियातल्या भावंडांनी लिहिलंय्, की वनस्पतींना भावना असतात म्हणून. आणि तुमच्या हिंदुस्थानचे नाव पुढे आणणारे डॉ.बोस याच लेखात म्हणताहेत, की ‘तीन हजार वर्षांपूर्वी पूर्वजांनी गंगेच्या काठावर उभे राहून ज्या चेतन एकतेचे रहस्य सांगितले, ते प्रथम लक्षात आले. “
वसंताने आपला होरा पुन्हा बदलला. तो म्हणाला, “बोसांनी म्हटले असेल, तर ते बरोबर आहे. पण आपल्या पूर्वजांनी वृक्षाचं संगोपन करणं, पुण्याशी जोडल्याचं मी काही ऐकलं नाही. “

“बहिऱ्यांना ऐकू कसं येणार? “कोपऱ्यात इतका वेळा वाचत बसलेले मामा, वाचण्याचाच आविर्भाव पुढे चालवीत म्हणाले.
वसंता उसळून म्हणाला, “मामा, आडून गोळ्या घालू नका. बायकाच्या आडून तिरंदाजी करायला तुम्ही काही अर्जुन नाही आहात, सांगा बरं झाडांना पोसल्यामुळे, त्यांची वाढ केल्यामुळे पुण्य मिळतं, असं तुमच्या धर्मानं कुठं सांगितलं आहे ते?“
मामा खुर्चीवरून उठत म्हणाले, “तुझी बायको आणि मी जे वाचत होतो, ते तुला चपखल उत्तर देणारं होतं, हा एक योगायोग आहे. हे पाहा, भविष्योत्तर पुराणात जे लिहिलं आहे ते. “भविष्योत्तर पुराणातल्या 128.2.10 या श्र्लोकावर मामांनी बोट ठेवलं.

अश्र्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यूग्रोधमेकं दशचिञ्चिणीकम्।
कपित्थबिल्वामलकीप्रयं च पञ्चाम्ररोपी नरकं न पश्र्चेत्।।
अर्थ: जो (मानव) एक पिंपळ, एक निंबवृक्ष, एक वड, दहा चिंचवृक्ष, तीन कवठाची, तीन बेलाची, तीन आवळीची व पाच आंब्याची झाडे लावतो, तो नरक कधीच पाहात नाही.
“पुराणातली वांगी पुराणात माम. तुम्ही एक वांग्याचं तरी झाड लावलंय् का? “
मामांनी आपल्या सुनेकडे, ती पहिल्यांदा वाचत होती ते मासिक फेकलं. स्वत: पुस्तकात डोकं खुपसलं व ते म्हणाले, “वाच, वाच सूनबाई, आपण आपले वाचत होतो, ते वाचायला सुरुवात करू. वडाचं तेल वांग्यावर काढत बसण्याचा उद्योग वसंतालाच शोभतो. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView