तीन क्रांत्यांचे आयुष्य

Date: 
Sat, 22 Dec 2012

वैमन्नाच्या आयुष्यात क्रांतीचे स्फोट धगधगत राहिले. पंधराव्या शतकात त्याचा जन्म आंध्रमधील कडप्पा जिल्ह्याात कटारुपल्ले येथे झाला. त्याचा थोरला भाऊ राजवेमा रेड्डी हा कोंडूबिडूचा राजा.
लहानपणी झालेले लाड वेमन्नाला भावले. एक स्त्रीवर त्याने सर्वस्व उधळलं. त्या जीवनाचा वीट आला तेव्हा वेमन्ना रानावनात भटकला. पुन्हा घरी आला. त्याला कुठेतरी राजवाड्यात गुंतवावे, म्हणून सोनारावर देखरेख करण्यासाठी राजानं त्याची नेमणूक केली .त्या सोनाराचं नाव अभिराम. अभिराम रोज उशीरा येई. आणि पूजेला उशीर झाला म्हणून सांगे. अभिराम पूजा तरी कोठे करतो, हे पाहण्यासाठी वेमन्ना दुसऱ्या पहाटे त्याच्या मागोमाग गेला. रानात लंबिका म्हणून योगी तप करत होता. तिथं अभिराम गेला. ते योगीराज अभिरामला म्हणाले, “उद्या पहाटे ये. “
वेमन्नाने एक कुटिल रचलं. तो अभिरामच्या देखरेखकार असल्यामुळे, त्यानं अभिरामाला कामात गुंतवून ठेवलं. आणि तो स्वत: पहाटे योगीराज लंबिकापुढे जाऊन बसला. त्यानं योगीराजाना विचारलं, “आपण अभिरामला इतक्या पहाटे कशाला बोलावलं हातं? “

“मंत्र द्यायला. “
इतके दिवस वेमन्ना शंातीचा शोध करत होता. तो अधीरपणो म्हणाला, “मलाच द्या ना तो मंत्रं. “
योगीराजांच्या लक्षात वेमन्नाचं कपट आलं. पण ते रागावले नाहीत. त्यांनी डोळे मिटले. भविष्यातली शक्यता लक्षता घेतली आणि एका संकल्पासह वेमन्नाच्या जिभेवर मंत्र लिहिला, “ॐ शिवम् “
वेमन्ना परतला, तो शरमेच्या सावलीतच. आपण केलं हेत चांगलं केलं नाही, अभिरामचा हक्क आपण चोरला, ते पाप त्याला परतीच्या पावलोपावली जाळत राहिलं. जसा काही तो उपरतीच्या निखाऱ्यावर चालत होता.
वेमन्ना परतला तो आयुष्यातली तिसरी क्रांती घेऊन. अभिरामपुढे त्यानं साष्टांग नमस्कार घातला. त्याला झालेली सगळी हकीकत सांगितली. आणि गदगदलेल्या आवाजात त्याला तो म्हणाला, “तुझ्या गुरूनं मला तुझा मंत्र दिला आहे; म्हणजे माझा गुरू तूच झालास. मला आशीर्वाद दे. “
चांगली माणसं एकमेकांचा मत्सर करतात तेव्हा त्यातून चांगलंच निघतं. अभिरामानं त्याला आशीर्वाद दिला. आणि वेमन्ना आपल्या नव्या शिष्यत्वाला जागला. तो संतकवी म्हणून गाजला, पुढे तो एकनाथ महाराजांच्या निष्ठेने. एकनाथ महाराज आपल्या गुरूचं नाव कायम करण्यासाठी आपल्या रचनेच्या शेवटी ‘एका जनार्दनी‘ असा उल्लेख करीत. आंध्रच्या या प्रसिध्द संतकवीनं तेच केलं. “विश्र्वदाभिराम विनूर वेम “ असा उल्लेख वेमन्ना प्रत्येक कवनाच्या शेवटी करी. समाजाच्या दुखण्याशी तो एकनाथांप्रमाणेच एकरूप झाला.
नुसत्या तीर्थालल जाऊन माणूस शुध्द होत नाही. हे सांगताना वेमन्नानं म्हटलं आहे, की गोदावरीच्या तीरावर एखादे कुत्रे राहिले म्हणून त्याला काही सिंहपद प्राप्त होत नाही. (कुक्क सिंह मगुने गोदावरिकी बोव।)
“नम: शिवाय “ हा शिव-मंत्र आहे. पण शिव म्हणजे चांगुलपणा. चांगुलपणाला नमस्कार करताना हातानं चांगुलपणा केला, तरच तो मंत्र जीवन शुभ करतो, शिव करतो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView