दक्षिणेची मीरा

Date: 
Sat, 1 Dec 2012

गोपवरम् या गावांची ती संध्याकाळ गुलाबानं रंगू लागली. अंधाराच्या रांगा मागे लागल्या असतानाही, संध्याकाळचे गुलाबी क्षण आपल्याच गोडव्यात गुंगले होते. त्या गुलाबी संध्याकाळच्या पलीकडे उभा असलेला काटेरी काळोख, त्या क्षणाचा गुलाब काही ओरबडू शकत नव्हता. पृथ्वीवरून पाहाताना त्या गुलाबी देखणेपणात गुंग झालेला माणूस म्हणजे आंधळ्या सुखलोलुपकणाचं प्रतीक होतं, की संकटाला सामोरं जातानाही, सुखाला समभावानं कवटाळण्याचा ता अलिप्त भाव होता?
केसन्नाच्या बाबतीत हे दोन्ही शक्य होतं. केसन्ना हा आंध्रच्या नेलारे जिल्ह्यातला गोपवरम्‌चा कुंभार. जातीनं कुंभार, मनाने कवी आणि वृत्तीनं साधू. सोळाव्या शतकातली ही गोष्ट.
केसन्नाची मुलगी मोल्लांबा. तिलाही वडिलांच्यासारखं साधुपण अंगी आलं. खोट्याबद्दल तिसरस्कार, खडखडीत बोलणं, न्यायपणा, असं सगळं रसायन तिच्यात होतं. त्याचं अर्थातच केसन्नाला कौतुक होतं पण अखेर व्यवहारही पहायला हवा होता. मुलीतला विरागीपणा वाढत चालला तेव्हा तिचं लग्न कसं होणार याच्या चिंतेत केसन्ना होता. गावातली वाढती कुजबूज त्याला हैराण करत होती. आणि म्हणून त्यानं त्या संध्याकाळी या गोष्टीचा सोक्षमोक्ष करायचं ठरवलं होतं.
मोल्लांबा जवळ जवळ मावळतीच्या काठावरून नदीवरून पतरली. जनावरांच्या पाठीवरचे पाणघडे तिनं उतरवून ठेवले. पाणी हिंदकळत होतं. हातातल्या कामापेक्षा तोंडातल्या नामाकडेच तिचं जास्त लक्ष होतं.
थोड्या वेळानं हळूहळू हातावर हात आपटीत मोल्लांबा देवासमोर बसली. रामाचं गीत ती रचित होती. त्यातला अखेरचा चरण ती मोठ्यानं उच्चारून गेली.
“कडिगे गुहुंडु रामपद! कंज युगंक भय्यम पैपुनन्”
मोल्लांबाने रचलेल्या रामायणातल एका श्लोकाचा तो चौथा चरण होता. त्या श्र्लोकाचा अर्थ असा होता, “रामाच्या पायधुळीमुळेच एका दगडाची बाई झाल्याची कथा, गुह नावाच्या नावाड्यानं ऐकली. असे ते रामाचे पाय, आपल्या नावेला लागले तर त्या नावेचं काय होईल कोणाला ठाऊक, असं गुहाच्या मनात आलं. त्याला भीती वाटली. आणि मोल्लांबाने चौथ्या चरणात म्हटलं होतं ते असं की या भयामुळे - गुहानं पुढे जाऊन रामाचे पायच घट्ट धरून ठेवले. “
रामाचे पाय धरण्याचं किती सुंदर कारण, मोल्लांबाची रामभक्ती सांगत होती पहा! त्यातच ती रंगून गेली होती.
पण तरीही केसन्नानं आपला प्रश्र्न पुढं रेटला. त्यानं विचारलं, “मुली माझं ऐकशील का? लग्न करशील का? “
“करीन बाबा, करीन, पण फक्त परमेश्र्वराशीच करीन. “
मोल्लांबा घरातून नदीकडे पळत सुटली. तिच्या डोळ्यापुढे नदीकाठचा गुहा नाचत होता. त्याच्या समोरचा राम तिच्या बाहुलीत होता. कृष्णाशी लग्न झाल्याचा दावा करणारी उत्तरेकडली मीरा आंध्रातल्या नदीवर साकारत होती. सूक्ष्म भावविश्र्वात दक्षिण-उत्तर असे फरक नसतात. देव दिसू शकतो का अशी शंका अनुभविकांना येत नाही.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView