दिवाळीची राक्षसी देवकथा

Date: 
Sun, 10 Jul 2011

“थांब, थांब, थांब” शुक्राचार्यांनी टाहो फोडला. बली यज्ञवेदीवर उभा होता. डाव्या हातातल्या झारीतले पाणी झरझरत उजव्या हातावर येत होते. शुक्राचार्यांची विनंती डावलून ते पाणी उजव्या हातावर झरतच राहीले. शुक्राचार्य पुन्हा कळवळून बळीराजाला म्हणाले, “तू ज्याच्या हातावर फक्त तीन पावलांचे दान देणार आहेस, तो वामन साक्षात् विष्णू आहे. हे दान देशील तर तुझा नाश होईल.”
बळीने उत्तर दिले ते कृतीने. त्याने दानाचे उदक सोडून दिले. वाढत्या वामनाकडे निर्भय चित्ताने पहात, शुक्राचार्यांना तो म्हणाला, “विष्णू सारख्याला याचक म्हणून मला मारावे लागणार आहे ही गोष्ट भाग्याची आहे.”
बोलता बोलता विष्णूने दोन पावलात त्रिभूवन व्यापले. तिसरा पाय कोठे ठेवू म्हणून बळीला विचारले. बळीने डोक्यावर बोट ठेवले आणि वामनाच्या तिसऱ्या पावलाने बळी पाताळात छिनला गेला.
बळी हा प्रल्हादाचा नातू. विरोचनाचा मुलगा. दैत्याच्याच कुळात जन्मलेला. पराक्रमी व उदार. त्याच्या उदारतेने विष्णू जिंकला गेला. बळीला वर देऊ केला.
बळीने स्वतःसाठी काहीच मागितले नाही. तो म्हणाला, “यमाच्या नावाने दीपदान करतील, त्यांना यमयातना नसाव्यात.”
त्या काळात दीपाचे महत्व, सुरक्षित रात्रीसाठी फार होते. बळीच्या एका वराने लाखो गरीब जनतेला दिवे मिळवून दिले. त्याच्या स्मरणार्थ दिवाळीचा पहिला दिवस. बळिप्रतिपदा. बलिदान हा शब्द व कृत्य, या बळीच्या भव्यतेचे स्मारक. बळी हा राक्षस होता, पण राक्षसी वृत्तीचा नव्हता. जन्माने एखाद्या विशिष्ट कुळात जन्मलेल्या माणसाची वृत्ती, निसर्गतः किंवा प्रयत्नाने बदलू शकते. बळीसारखे राक्षस पाहिले की म्हणावेसे वाटते, “देवा माझ्या अंगात राक्षसाएवढे तरी देवपण येऊ दे.”

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView