दुसरी उपायकथा: नाणेयोग पध्दती

Date: 
Sun, 13 Jul 2014

कमलाबाईंचा एकुलता एक मुलगा विश्र्वनाथ इंजिनिअरिंगच्या परीक्षेत पास झाला आणि दोन वर्षांसाठी त्याला अमेरिकेत स्कॉलरशिप मिळाली. कमलाबाई अंथरुणाला खिळलेल्या नव्हत्या, पण त्यांची प्रकृती इतकी ढासळली होती, की त्या दोन वर्षे तग धरू शकतील असे संागणे कठीण होते. मुलाला “मी जातोच” असे म्हणवेना. आणि आईला तू ही संधी माझ्यासाठी सोड असे सांगवेना. काय करावे? या संभ्रमात एक आठवडा गेला आणि आईचे बरेवाईट झाले तर मन खात राहील, अशी विश्र्वनाथला रास्त भीती वाटत होती. कोणीतरी देवाला कौल लावून पाहण्याची सूचना केली. ती आईला पटली, ती म्हणाली, “देवाने कौल दिल्यावर तू गेलास अणि तुला न पाहता मला इहलोक सोडावा लागला तर मला एवढे तरी समाधान होईल की, देवाला कौल लावला होता आणि जे घडले ते त्याच्याच संमतीने घडले. “

पण हे घडावे कसे? कारण विश्र्वनाथचे वडील अण्णासाहेब हे निरीश्र्वरवादी. त्यांना बुध्दीवाद फार प्रिय. त्या दिवशी दुपारी विश्र्वनाथला एक युक्ती सुुचली. तोही बु्ध्दीवादी होता, बहुश्रुत होता. पिता, पुत्र आणि आई चहाला बसले. अण्णांनीच विषय काढला. तेव्हा विश्र्वनाथला आनंद झाला. “मग काय ठरविले? उद्या सकाळी ‘हो का नाही’चे पत्र जायला पाहिजे. शेवटचा दिवस आहे. “
“अजून माझा नीटसा निश्र्चय होत नाही. आईची प्रकृती बरी नाही. “”ते खरे” अण्णा म्हणाले, “पण ही संधी डोळ्यासमोर गमावलेली बरी वाटत नाही. कोणचाही निर्णय घेतला तरी त्याचा योग्यायोग्यपणा भविष्यात ठरणार असतो तेव्हा मोठी पंचाईत होते. बुध्दीवाद दुबळा पडतो.मती कुंठीत होते. “
विश्र्वनाथ आपली नवी कल्पना मनात उजळवून काहीशा उत्साहानेच म्हणाला, “अण्णा! आपण नाणेफेक करून पाहू या?“ “म्हणजे काय?” “एक नाणे आपण उडवू. तिघेही एकचित्त करून सांगू की, मनाला वाटेल त्याप्रमाणे त्याने हवेतल्या नाण्यावर परिणाम घडवावा, किंवा घडवू नये. नाणे खाली पडेल. तेव्हा वरच्या बाजूला राजचिन्ह येईल, तर मी अमेरिकेला जाईन. उलटी बाजू येईल तर अमेरिकेला जाणार नाही. “

“हा दैववाद झाला. “ अण्णासाहेब तिरस्काराने म्हणाले. “आपल्या मनाची शक्ती बाह्य वस्तूवर परिणाम घडवते हे पटत नाही. “
विश्र्वनाथने मागे वळून वृत्तपत्राच्या ढिगातून दोन अंक बाहेर काढले. तो म्हणाला, “हे 8एप्रिल 1968चे सकाळ आणि नवशक्त ीचे अंक पाहा. मास्कोची बातमी आहे. एक बाई टेबलावरची ब्रेड पलीकडच्या टोकावरून तोंडापर्यंत, नुसत्या मनाच्या शक्तीने आणू शकते. “
अण्णांंचा रशियातील बुध्दीवादावर विश्र्वास होता. त्यांनी बातमी सविस्तर वाचली. त्यात चूक नव्हती. ते म्हणाले, “त्या बाईने अशी शक्ती सवयीने कमावली होती. म्हणून तिला ते शक्य झाले. आपल्याला तेे कसे शक्य होणार? “

विश्र्वनाथ या प्रश्र्नाची अपेक्षा करीतच होता. त्याने उत्तर दिले, “पहिल्या दिवशी त्या बाईने हा प्रयोग केला तेव्हा टेबलावरचा पाव काही दृश्यपणे हलला नसेल, पण 1000 दिवसांनी जो दृश्य परिणाम तो त्याचा एक सहस्रांश किंवा त्यापेक्षाही कमी अल्पांश म्हणा हवा तर परिणाम पहिल्या दिवशी घडला असणाच आणि मुख्य मुद्दा असा आहे की, मनाचा परिणाम बाह्य वस्तूवर घडता, हे या स्त्री ने प्रत्यक्ष दाखविले आहे. पण आमच्या विज्ञानात, इलेक्ट्रॉनच्या दिशेने पाहिल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनची जागा बदलते हा सिध्दंात आहेच. “

अण्णांना हे स्पष्टीकरण पटलेले दिसले. हळूहळू विचार करीत जणू काही स्वत:शीच बोलतो आहोत अशा स्वरात ते म्हणाले, “होय, बरोबर. येथे नाणे उडविण्याला काही हरकत नाही. एरव्हीसुध्दा काहीतरी जड वस्तू, पोकळीत फिरून स्थिर होते. तेव्हा मी माझा निर्णय स्थिर करू शकतो. समजा एखाद्या कूट प्रश्र्नावर निर्णय घ्यायचा आहे, तर मी काय करतो? माझे डोके खाजवतो. मेंदूतील कित्येक पेशी, अणुवेगाने फिरतात. ज्यावेळी हे जड कर, तुलनात्मक स्थिर गतीला येतात, तेव्हा त्या गतिस्थानावरून मी ‘माझ्या मनाचा निर्णय झाला’, असे म्हणतो. “पुन्हा क्षणभर थांबून अण्णाच म्हणाले, “नाणेफेकीच्या प्रक्रियेशी, मेंदूतील हालचालीचे समीकरण मी मानले, तर ते कॉम्प्युटरयुगात योग्य होईल काय?”

“अण्णा, हा कालचा, बारा मे अडुसष्टचा लोकसत्तेचा अग्रलेख पाहा. एका तरूण जोडप्याने दोघांची हकीगत कॉम्प्युटर यंत्राला पुरविली. आणि त्या यंत्राच्या संमतीने लग्न केले. पण समजा ही माहिती पुरवताना, मुलाने ‘माझा स्वभाव अबोल आहे’ अशी माहिती पुरवली, तरी ती माहिती आत्मपूर्वग्रहदोषपूर्णच असणार. किंवा अबोला माणसे कालांतराने बोलकी झाल्याची उदाहरणे आहेत. मानवी मनाचा प्रश्र्न पुढे येईल, तेव्हा कॉम्प्युटर आणि नाणेफेक पध्दतीत फार फरक नाही. “

“मग बुध्दीवादाचे काय?”अण्णा म्हणाले.
विश्र्वनाथ आत्मविश्र्वासपूर्ण, पण मंद स्वरात म्हणाला, “अण्णा! बुध्दीवाद सोडावा असे मी म्हणणार नाही, कोणीच म्हणत नाही. ज्या मर्यादेपर्यंत बुध्दी स्पष्ट निर्णय देते, तो पर्यंत हा नाणेफेकीचा प्रयोग अर्थशून्य आहे. “
“पण या नाणेफेकीतून चुकीचा निर्णय घेतला गेला असे ठरले तर? “
सारांश, बुध्दीवाद वापरल्यानंतर, सत्कर्मासाठी, जेव्हा एखाद्या पुढे ठाकलेल्या प्रश्र्नात उलट सुलट पर्याय प्राप्त होतात, तेव्हा या युक्तीचा वापर साधू शकेल. अनिश्र्चय, निर्णय अशक्यतेची स्थिती किंवा तात्पुरते विचारवादळ, यातून डोके काम करीनासे झाले म्हणजे सद्बुध्दीने ही युक्ती वापरावी, मग ती समस्या कुटुंबातील किरकोळ का असेना. बुध्दीने निर्णय घेता येत नाही, पण वरील चर्चासंधानाप्रमाणे नाणेफेकीची युक्ती बुध्दीनेच पत्करली, म्हणजे त्यातून निर्माण होणारा निर्णय अबुध्दीवादी मानून चालणार नाही. दैववादाती हताशपणा किंवा प्रयत्नविरोध येथे कोठेही नाही. प्रयत्नाच्या किंवा बुध्दीच्या मर्यादा संपतील तेथे त्यांचा अडलेला रस्ता पुन्हा तिकडेच वळविण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. एखादा स्वावलंबीपणाचा अभिमान बाळगणारा माणूस रस्त्याने चालत असता, पडून त्याचा पाय जायबंदी झाला, आणि त्याने स्वत:च्या पैशाने टॅक्सीचे जे पैसे तो देणार असतो, ती त्यानेच साठवलेली सुप्त शक्ती असते. तिची मदत घेणे हा परावलंबीपणा नव्हे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView