देवाविरुध्द बंड करणारा राग

Date: 
Sun, 25 Sep 2011

पाऊस कोसळत होता. पावसाच्या धारातून घोंगावणारा वारा, सळसळते शब्द नाद, वातावरण तीव्र करीत गवाक्षातून घुसत राहिला. विजा चमकत होत्या. कडाडत होत्या. जमीन थरारत होती.
पंचमहाभूतांनी पृथ्वीवर तांडव चालवले होते. अब्राहम शेकोटीपाशी शांत सुखावला होता.
अब्राहम हा परम देवभक्त.
दारावर थाप पडलेली अब्राहमला ऐकू आली. जणु काही प्रथम हळू मारलेले दारावरचे धक्के निरुपयोगी ठरल्यावर, अधिक जोराने किंचित दारावर थाप पडावी, तशी.
अब्राहम उठला. त्याने दार उघडले. बाहेर पाहिले तर एक ऐंशी वर्षांचा जख्ख म्हातारा. रागवाण्याचे त्राण नसलेला, आणि मुळीसुध्दा हक्क नसलेला. अजिजीच्या स्वरात तो म्हातारा अब्राहमला म्हणाला, “मला आत घ्याल? तीन दिवस उपाशी आहे. काकडतो आहे. दया करा.या दुष्ट देवाने माझ्यावर ही पाळी आणली आहे. “

पहिली वाक्ये ऐकत असतानाच अब्राहमने म्हाताऱ्याला आत आणून आसनावर बसवले होते. वारा येऊ नये म्हणून दार लावून घेतले. निखाऱ्याची शेगडी त्याच्याजवळ ठेवली. व जेवणाचे ताट आणण्याच्या तो तयारीत होता. पण शेवटचे वाक्य ऐकताच अब्राहम पेटून उठला. तो म्हणाला, “देवाबद्दल बोलशील तर याद राख. मी आज वर्षानुवर्षे देवाच्या दर्शनासाठी साधना करतो आहे. “
म्हाताऱ्याचे ओठ थरथरत होते. अंग लटलटत होते. तो म्हणाला, “तू चांगला आहेस. देव वाईट आहे. त्याने माझे वाटोळे केले. “
“नीचा, तुझ्या कर्माने तुझे वाटोळे केले. देवाने नव्हे. “अब्राहमने त्या म्हाताऱ्याच्या बखोटीला धरले व दाराबाहेर ढकलून दिले. म्हातारा पुन:पुन्हा विनवत होते. पण अब्राहम त्याचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने धाडकन दार लावून घेतल;.
“अब्राहम-“ धीर गंभीर आवाज मागून आला. ज्या दर्शनाची, ज्या श्रवणाची, वाट पहात होतो, तोच हा देवाचा आवाज, हे अब्राहमने ओळखले. आपल्या कृत्याने देव साहजिकच संतुष्ट झाला, हाच अब्राहमचा अंदाज होता.
अब्राहम मागे वळला, तेव्हा देवाचा चेहरा त्याला कठोर दिसला. तीव्र स्वरात देव म्हणाला, “अब्राहम, काय केलेस तू हे?याच्या शिव्या ऐकत त्याला मीच जगवले ना?मग त्याला तू ऐंशी मिनिटेही सांभाळू शकला नाहीस? “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView