नारद आणि अर्जन

Date: 
Sun, 6 Nov 2011

‘नारायण नारायण’ असा घोष करीत नारद द्वारकेच्या महाद्वारातून राजवाड्यापर्यंत आले.
नारदांना अडवेल असा दरवाजा त्रिखंडात कोणत्याच राजवाड्यामध्ये नव्हता. तेव्हा द्वारपालाने त्यांना अडवण्याचा प्रश्र्नच नव्हता. ते आपण होऊनच थांबले आणि त्यांनी विचारले, “हा कृष्ट काय करतो आहे? “
“महालात पूजेला बसले आहेत. “द्वारपालाने नम्रतेने उत्तर दिले.
वीणेवर टेकवलेल्या बोटातून झंकार निघाले. आणि ओठांच्या पाकळ्यातून स्मितलहरी आल्या. नारद मनात म्हणाले, “या कृष्णाची पूजा सगळे करतात. आणि हात स्वत: कोणाची पूजा करतो बुवा! “
त्याचे उत्तर नारदांना दिले ते महालाबाहर उभ्या राहिलेल्या अर्जुनाने. अर्जुन म्हणााला, “नारदमहाराज, कृष्ण माझी पूजा करीत बसला आहे..”
“तुझी? “नारदांच्या प्रश्र्नात पूर्ण अविश्र्वास आणि तितकीच हेटाळणी भरली होती.
अर्जुनाने आव्हान फेकले, “जा, जा तुम्ही स्वत:च आत जाऊन पहा. “
नारदांना आत जाणे भागच होते. उत्सुकतेला आव्हानाचे स्वरूप आल्यावर नारद थोडेच ऐकणार होते? कृष्णाच्या ध्यानमंदिराची जागा अगदीच थोडी होती. जेमतेम, त्याने बसून एखाद्या माणसाला आत येण्याइतकी.
नारद गेला तेव्हा त्यांंची हेटाळणी गेली होती. मग हेटाळणीची जागा संतापाने घेतली. ते अर्जुनाला म्हणाले, “खोटारड्या, मला फसवतो आहेस? अरे, कृष्णमहाराज माझी पूजा करीत आहेत. पहा आत जाऊन. “
आता पेटण्याची पाळी अर्जुनाची होती. अर्जुन चडफडत आत गेला आणि तितक्याच उत्साहाने बाहेर आला. नारदाची वीणा डाव्या हाताने हलवत अर्जुन बजावत राहिला, “मला बनवू नका. कृष्ण माझीच पूजा करीत आहे. “
पुन्हा नारद आत गेले आणि चवताळून बाहेर आले. अर्थात अर्जुनाच्या अंगावर चवताळत.
आतल्या बाजूला कृष्ण मिटल्या डोळ्यांनी मधुर ध्यान करत होता. त्याच्यासमोर फक्त आरसा होता. एका मंद समईच्या उजेडात आत्मदर्शन घेत, त्याचे महामंडल ध्यान चालू होते.
वास्तविक, दर्शन हे आत्मदर्शन घ्यायचे असते. अभ्यासाला स्वाध्यायाचे रूप द्यायचे असते. डोळे उघडून कर्म करायचे असते; पण ते संपल्यावर डोळे बंद करून, पूज्यरूप व्हायचे असते. स्वत:ला पहायचे असते. दुसरा काय करतो, दुसऱ्याची साधना कोणती, एवढीसुध्दा उत्सुकता बाळगायची नसते. डोळे उघडे ठेवून पूजेकडे पाहिले, की पूजा होऊ शकेल, ती फक्त अहंकाराची.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView