निवडक संदर्भ

Date: 
Sun, 23 Nov 2014

उपनिषद – छांदोग्य
ओमित्येतदक्षरमुग्दीथमुपासीत।
ओमिति ह्युग्दायति तस्योपव्याख्याम् ।। छांदोग्य 1.1.1।।
तत्त्वबोधमर्यादित भावार्थ: चित्त एकाग्र करून ओम या अक्षराचा नामोच्चार करून त्याची प्रार्थना करावी. ओम या शब्दोच्चारानेच उद्गाता यज्ञात उच्चस्वरात सामगान करतो.

ओमित्येतदक्षरमुग्दीथ:।।छां.1.1.5।।
तत्वबोधमर्यादित भावार्थ: उपासना करण्यायोग्य ओम हे अक्षर आहे.
तदेतन्मिथुनमोमित्येतस्मिन्नक्षरे सॅं् सृज्यते।।छां.1.1.6।।
तत्वबोधमर्यादित भावार्थ: ओम ह्या अक्षरोच्चाराने सर्व कामनासिध्दी होते.

यध्दि किं चानुजानात्येमित्येव तदाह –छां.1.1.8।।
तत्वबोध मर्यादित भावार्थ: अनुमति दर्शविणारे ओंकार हे अक्षर आहे. व्यवहारात एखादा धनवान किंवा ज्ञानी संमती दर्शवताना ‘हो’असेच म्हणतो.
ओमित्याश्रावयत्योमिति शॅं् सत्योमित्युग्दायति।। छां. 1.1.9।।
तत्वबोधमर्यादित भावार्थ: ओम असा शब्दोच्चाराने आरंभ करून अध्वर्यु यज्ञकर्मास सुुरुवात करतो. ओम असा आरंभ करूनच यज्ञ होता, यज्ञमान शंसन करतो –कर्म करतो. तसेच ओम याचाच मंत्रोच्चार करून उद्गाता उद्गान करतो.
यदा वा ऋचमाप्नोत्यामित्येवातिस्वरति।।छां.1.4.4।।
तत्वबोधमर्यादित भावार्थ: जेव्हा अध्ययनाने ऋचेला आत्मसात करून घेतो तेव्हा उपासक ओम असेच मोठ्या उच्चाराने आदरपूर्वक स्वर घुमवतो.

ओमिति ह्येष स्वरन्नेति।।छां.1.5.1।।
तत्वबोधमर्यादित भावार्थ: ओम असा शब्दोच्चार करीतच (हा सूर्य) जातो.

ओ 3 मदा 3 मों 3 पिबा3 मों 3 देवो वरूण: प्रजापति:।
सविता 2 न्नमिहा 2 हरन्नपते3 ऽन्नमिहा 2 हरा 2 हरो 3 मिती।।छां. 1.12.5।।
तत्वबोधमर्यादित भावार्थ: आम्ही भोजन करता, पान करतो, (मंत्र गायनासाठी येथे तीन वेळा मंत्रोच्चार सुचविला आहे.). शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात, “द्योतनशीलतेमुळे सूर्य जगाच्या वर्षणामुळे वरूण, प्रजांच्या पालनामुळे प्रजापति व सर्वांचे प्रसवितृत्व असल्यामुळे सर्वांंना प्रसवणारा आदित्य सविता म्हटला जातो. या प्रकाराने पर्यायकारण असा हा सूर्य आम्हासाठी अन्न येथे आणो. के अन्नपते! येथे अन्न घेऊन ये. ओम हे शेवटचे अक्षर सूर्योपासनेचा मंत्र समाप्त झाला हे सुचवितो.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView