नोकरी गमावली देव कमावला

Date: 
Sun, 18 Sep 2011

गुरू नानक पोटासाठी काही उद्योग करतील अशी आश त्यांच्या नातेवाईकांना असण्याच्या काळातील गोष्ट आहे. एका किराणा मालाच्या दुकानात नानक काम करीत होते. आध्यात्म भरलेल्या डोक्याला जोडलेल्या हातून व्यवहार होऊ शकणार नाही, हे नानकांच्या वडिलांना अजून समजावयाचे होते. देवाचे वेड लागलेला नानक सगळे जग प्रभुमय पहात होता. या जगात प्रभु ठायी ठायी भरलेला आहे. सगळे आहे ते प्रभुचे आहे. माणसाने त स्वत:चे समजण्याचा अहंकार व्यर्थ आहे, अशा कोटीतला पोहचलेला नानक, व्यवहाराच्या देवघेव करणार तरी कसा?
पण नानकांना जे कळले होते, ते त्यांच्या नातेवाईकांना कळायचे होते.
दुकानात एक गिऱ्हाईक शिरले, तेव्हा दुकानाचे मालक बाहेर पडायच्या तयारीत होते. मालकांना नानकाला सांगितले, “या गिऱ्हाईकाने एक रूपया दिला आहे. यांना चौदा मापे ध्यान दे. मी आत येतोच. “
नानकांनी माप हातात घेतलं आणि गिऱ्हाईकाच्या पोत्यात तो एकेक माप टाकू लागला. त्याच्या मनात विचार येत होते, “कोणाचा रूपया आणि कोणाचे धान्य? सगळे एका देवाचे आहे? होय, होय देवा, सगळे काही तुझे आहे. माझा अंहकार व्यर्थ आहे. प्रत्येक पदार्थ तुझा आहे. प्रत्येक वस्तू तुझी आहे. रुपिया तेरा, अनाज तेरा, दुकान तेरा, मकान तेरा, तेरा-तेरा, तेरा तेरा. “
मनात हे विचार चालले होते तरी तोंडाने, मापाचे आकडे नानक मोजत होता. बारापर्यंत आकडे मोजून झाले. पण तेरा आकडा आल्याबरोबर एखादी वीज चमकून जावी तसे नानकाला झाले.
मनातले तेरा व वाणीतले तेरा एकत्र घुमले. आणि मग चौदावे माप, पंधरावे माप, चाळिसावे माप टाकतानासुध्दा ‘तेरा‘चा उच्चार पुढे जाईना.
काही क्षणापूर्वी परतलेला मालक निखारलेल्या डोळ्यांनी नानकाचे ऊतू चाललेले औदार्य पहात होता.
मालकाचे एकच झेप पुढे टाकली. नानकाच्या हातातून माप हिसकून घेतले. रूपया घेऊन सोने देण्याचा व्यवहार मालकाला परवडण्याजोगा नव्हता. आणि आत्म्याला खळगी पाडून पोटाची खळगी भरणे, नानकाला पसंत नव्हते.
नानकाने नोकरी गमावली. नक्कार्य गमावले, आणि ती कमाई शतकानुशतके प्रभुसेवा करीत टिकली आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView