बसवेश्र्वरांचे मुंजतत्व

Date: 
Sun, 17 Mar 2013

बामेवाडी म्हणजे विजापूर जिल्ह्यातलं छोटंसं गाव. तिथं मादरस हे शैव ब्राह्मण, वस्ती करून रहात असत. त्यंाची पत्नी मादलंबिका. त्यांचा मुलगा बसवेश्र्वर.
आठव्या वर्षी काय घडतं कुणाला ठाऊक?आठव्या वर्षी शरीरातल्या सर्व पेशी एकदा बदलाचं चक्र पूर्ण करून बसलेल्या असतात. त्या वयाच्या सुमाराला ख्रिस्त, शंकराचार्य, कृष्ण, राम, ज्ञानेश्र्वर यांच्या वयात क्रांती झाली होती. ते मुंजीचं वय. म्हणून जेव्हा जुन्या रूढीप्रमाणे बसवेश्र्वरांच्या वडिलांनी घरात मुंज जाहीर केली, तेव्हा या नव्या धर्मश्रेष्ठानं स्पष्ट सांगिलतं, “भांडं बाहरून साफ करून उपयोग काय? ते आतून साफ करायला हवं.”

मुंजीचा नेमका अर्थ वैदिक काळात तोच होता. ज्ञानग्रहणासाठी गुरूकडे मुलाची अनुमती, याशिवाय कसालही अर्थ मुंजीला पूर्वकाळात नव्हता. तेव्हा वरवरच्या रूढीला नाकारून, बसवेश्र्वरांनी, मूळ अर्थानं मात्र मुंज नाकारली नाही. ते सरळ ज्ञानग्रहणासाठी घराबाहेर पडले. कृष्णाकाठी कुंडल संगम इथं पोचले. जातवेद मुनींच्याकडून त्यंंानी लिंगदीक्षा घेतली. आणि धर्मग्रंथांचा सविस्तर अभ्यास केला. एवढ्या योग्यतेच्या धर्मपुरुषाला क्षेत्र संन्यासात अडक वून ठेवणं, जातवेदमुनींना बरं वाटलं नाही. आणि म्हणून त्यांनी ‘कल्याण नगरी’त राज्य करणाऱ्या बिज्जलाकडे बसवेश्र्वरांना पाठविलं. आपल्या गुणांनी बसवेश्र्वर हळूहळू वर चढत तिथं प्रधान झालां. त्यानं प्रजेला सुखी केलं. समाजातल्या अनेक वाईट रूढी बाजूला करून, एक बलसंपन्न समाज निर्माण केला. वीरशैव समाज अनेकांनी आदरला. काश्मीरचा राजा महोदय, महाराष्ट्राचा मुंडैय्य, तेलंगणातले मारच्य, जाम्मय्य व सकलेश मादरस, ओरिसाचा सुज्ञानीदेव, इत्यादी श्रेष्ठींनी बसवेश्र्वरांचं अनुयायित्व पत्करलं.

बसवेश्र्वरांनी अस्पृश्यता नाकारली. “वाईट वासना धरणारा अस्पृश्य”अशी त्यांनी व्याख्या केली.
पण चांगल्याचा द्वेष व्हावा आणि त्या द्वेषानंच चांगल्याची परीक्षा व्हावी, अशी नियती असते. त्यामुळे राजा बिज्जल आणि प्रधान बसवेश्र्वर यांच्यात गैरसमज निर्माण झाले. राजाने दोन वीरशैवांना प्राणदंडाची शिक्षा दिली तेव्हा जगदेव या वीरशैव तरूणानं बिज्जलला मारलं, यादवी सुरू झाली.
वेळ संध्याकाळची होती. बसवेश्र्वरांच्या आयुष्यातली संध्याकाळही समीप आली. समाजाचं रक्त एक करण्यासाठी त्यांची धडपड होती, रक्तपाताची धडपड नव्हती. रक्तच समर्पण करायचं तर स्वत:चं, अशा निश्र्चयानं बसवेश्र्वर निघाले. संगमेश्र्वरराच्या चरणापाठशी पोचले.
बसवेश्र्वरांना डोेळे उघडले. देहाचे डोळे मिटणं, ही आत्म्याचे डोळे उघडण्याची खूण असते. बसवेश्र्वरांचे अंतरनेत्र उघडले, उजळले आणि पाहाता पाहाता, त्यांची आत्मज्योत शिवरूप झाली.
पण असली ज्योत कधी नष्ट होत नाही, तर नष्ट होऊ घातलेल्या मुर्दाड मनांना नवा जन्म देते. आजचा वीरशैव समाज, ही बसवेश्र्वरांच्या त्यागज्योतीनं फुललेली फुलं आहेत.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView