बिन पैशाचा वकील

Date: 
Sat, 30 Jun 2012

कृष्णकारस्थानातलं एक आक्रित पुन्हा सांगण्याजोगं आहे.
कृष्ण कौरवांच्या दरबारात शिष्टाईसाठी बिनपैशाचा वकील म्हणून गेला. आपल्या लांबलचक भाषणाचा समारोप करताना तो म्हणाला, ‘द्यूत चांगलं का वाईट, याबद्दल माझं मत देण्याचं हे स्थळ नाही, एकदा धर्मराजानं द्यूत खेळायचं मान्य केलं, मग त्याने द्यूताचे सगळे नियम पाळले. त्यानं कपट केलं नाही, पण त्याच्यावर केलेलं कपट, त्यानं सोसलं. अगदी द्रौपतीला स्वत:चा खास निरोप पाठवून त्यानं तिला दरबारात निरोप धाडला. अवघड अवस्थेत असतानासुध्दा ती आली.“
आवाज चढवून कृ ष्ण म्हणाला, “तुमची आई, बहीण, पत्नी तिच्या जागी होती, अशी कल्पना करा. डोळ्यापुढे आणा ते चित्र. मग तुम्ही मला सांगा की, जिंकलेल्या स्त्रीलासुध्दा तुम्ही अशी वागवाल का? तुमच्या घरच्या किती दासी तुम्ही आजपर्यंत दरबारात वस्त्र ओढण्याच्या स्थितीपर्यंत आणल्या?
शेवटी प्रत्येक स्त्रीला मातेचं पुण्य असतं. एका स्त्रीचा अनाठायी अपमान हा प्रत्येक मातेचा अपमान आहे.
संस्कृती ही एक प्रगत वस्तू असते. कुत्री नागवीच हिंडतात आणि लहानपणी मुलंसुध्दा. कपडे घालणं हा एक आवश्यक संस्कार तुम्ही मानल्यानंतर, तुम्ही तो संस्कार खाली उतरवून ठेवणं, तुम्हालाच कमीपणा आणणारं नाही का? तेही सोडा. द्यूतातल्या कराराप्रमाणे पंाडव वनवासात जाऊन आले. आता त्यांचं राज्या त्यांना परत का मिळू नये? अन्याय करणं सोपं आहे. अन्याय पचवणं फार अवघड आहे. त्यात केव्हा ना केव्हातरी स्वत:चं पोट फुटून जाईल. तसं फु टू नये. दु:शासन, दुर्योधन, कर्ण, शकुनि सगळ्यांतच चांगले गुण आहेत.
भविष्याचा शाप त्यांनाही लागू नये, अशी माझी मनोमन इच्छा आहे. तुमच्याच कल्याणाबद्दल माझ्या नम्र इच्छेचा आदर करा. मला अपयश देऊ नको. तुम्हा स्वत:ला अपयश देऊ नका. माझ्या सामोपचाराच्या भांड्यात न्यायाची, किमान न्यायची भीक घाला.”
शेवटचं वाक्य बोलत असताना कृष्णाच स्वर गदगदला. सभाही गदगदली. त्या गदगदण्यात कृष्णानं पूर्णविराम केला. तो म्हणाला, “आपल्यपैकी बहुतेकजण आता मध्यम वयापलीकडे गेले आहेत. आपण काही लहान पोरं नाही, छोट्या भंाडणाच्या भोवती नाचत बसायला. या नश्र्वर जगातून केव्हातरी आपल्या सगळ्यांना जायचं आहे. आज जे आपण ‘माझं, माझं’ म्हणून जमवणार आहोत, ते सगळं इथेच राहणार आहे.
ते आपर हे कसं जमवलं त्याची आठवण. वस्तू बदलते, वस्तुस्थिती बदलत नाही. पुढच्या पिढ्यांनी कौरव-पांडव नावाच्या एकशेपाच देवांची पूजा एका देव्हाऱ्यात करावी, असे वागा. नाहीतर आज नाश पावाल आणि उद्या तोंड लपवून तुमची नावं पुढल्या पिढ्यांना घ्यावी लागती. तुम्हाला सुबु्‌ध्दी सुचो, तुमचं कल्याण असो. “
बस्स!
एवढंच.
कृष्ण खाली बसला. तेव्हा एक मधुरमंगल, पवित्र शंातता तिथं पसरली होती. एवढी शंातता की प्रत्येकाचे श्र्वास ज्याला त्याला ऐकू येत होतेच पण शेजारच्यालाही. खरं तर सगळं सभागृह एक श्र्वास झालं. एकक्षोभ झालं. त्या क्षणाला सामोपचाराच्याच बाजूनं मतदान झालं असतं, तर कृष्ण त्याच्या सामोपचाराच्या भांड्यात कौरवांचं सगळं राज्य मिळवूनही, परतू शकला असात.
अगदी शकुनि, दर्योधन, कर्ण यांच्या संमतीनं.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView