बुध्दाची महादीप कथा

Date: 
Sun, 25 Dec 2011

एखादी कथा अनेक धर्मकथा कोश सजवते. भारतातली व कंबोडियातली एक कथा सारखीच असलेली वाचनात आली.
गोष्ट तिंगमिंग राजाच्या वेळची. बुध्दधर्माचं राज्य. म्हणून तिथं एक बुध्द म्हणून त्रिपिटकाचार्य येऊन पोहोचले. राजाला म्हणाले, “मला इथल्या धर्मगुरूचं पद दे. मी तुला चांगला उपदेश करीन. तुझं कल्याण करीन. “
तिंगमिंग हा बुध्दधर्माचा उत्तम अभ्यास केलेला राजा होता. तो शांतपणाने गुरूपदाची इच्छा धरणाऱ्या नवागताला म्हणाला, “ आपण धर्मग्रंथांचं पारायण आणखी एकदा करा. मग आपल्या म्हणण्याचा विचार करू.”
आलेले विद्वान भिक्षू चाांगलेच रागावले. पण राजापुढे बोलायची सोय नव्हती. कदाचित आपलंच काहीतरी वाचायचं राहिलं असेल, असे समजून धर्मग्रंथ त्यांनी पुन्हा वाचले.
तिंगमिंगच्या दरबारात आत्मविश्र्वासानं पुन्हा भिक्षु महाराज अवतीर्ण झाले. पुन्हा तीच विनंती राजाला करायला लागले. पण आचार्यांनी आपल्या विनंतीची पुरुक्ती केली तशी राजानेही आपले तेच म्हणणे, थोडाफार बदल करून पुढे मांडले. राजा म्हणाला, “यावेळी आपण अगदी एका बाजूला बसून, लोकांच्यात न मिसळता धर्मग्रंथ वाचा आणि मग या. “
भडकलेले त्रिपिटकाचार्य पुन्हा परतले. यावेळी मठाऐवजी नदीकाठच्या गुहेत ते गेले. आणि त्यांनी धर्मग्रंथाचे पारायण केले. मठातल्या शिष्यापासून दूर, एकट्या एकाने चिंतन करता करता ते वाचन आचार्यांना अगदी निराळ्या पातळीवर घेऊन गेले. काही मागावे अशी त्यांची इच्छाच उरली नाही.
वर्षे लोटली. अमात्यगण घेऊन तिंगमिंग राजा स्वत: त्यांना शोधत आला आणि म्हणाला, “राजगुरूपद आपली वाट पहात आहे. “
ज्ञानाची तृप्ती प्यालेले आचार्य, भरल्या कंठाने म्हणाले, “खरा धर्म नुसत्या वाचनाने नाही, तर वर्तनासाठी आहे. उपदेशाचा अहंकार आता मी बाळगणार नाही. ‘आपदीपो भव’, स्वत:चा दिवा बन, हेच खरं आहे. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView