ब्रह्मघोटाळा कोणाचा?

Date: 
Sat, 27 Oct 2012

वसंताला राहवेना. तो उसळून म्हणाला, “मामा तुमचे हे नेहमीचंच असतं. विचारणाऱ्याच्या प्रश्र्नाला बगल द्यायची. ब्रह्म म्हणून तुम्हाला काय विचारलं तर तुम्ही सगळंच ब्रह्म म्हणून सांगणार आणि त्यांनी त्यात घोटाळा झाला तर म्हणणार, बघा ती माया. ही काय उत्तराची पध्दत आहे का? “
मामांनी वसंताचा प्रतिहल्ला शांतीनं स्वीकारला, ते म्हणाले, “ब्रह्म मरू द्या. “
“ब्रह्म मरेल तेव्हा जग सुटेल घोटाळ्यातून. “ वसंतानं टाळ्या पिटल्या.
“तुमची आणि माझी इच्छा एकच आहे. “ मामांना शेक्सपिअर आठवला. “If wishes were horses…” अशी काहीतरी सुरुवात करावी, असं त्याला क्षणभर वाटलं, पण मामांनी उच्चार मनातच गारद केला आणि त्यांनी निराळची मांडणी पुढे मांडली. “सगळं काही स्पष्ट असावं असंच तुझं मत आहे ना? “
“होय. आधुनिक विज्ञानाचंच तसं मत आहे. “
“मग ज्या वस्तूंनी जग भरलं आहे त्या सगळ्या वस्तू आपल्याला पाहाता येतात का? “

“नाही येत. पण सिध्द करता येतात, अनुभवता येतात. “
मामा डोळे मिटून म्हणाले, “अनुभवता येतात. एकदम जरुरीपेक्षा जास्त कबूल करू नकोस. पायरी-पायरीनं घे, वस्तूचं अखेरचं रूप हे स्थितीरूप आहे की तरंगरूप आहे? “
“दोन्हीही” वसंता हेटाळणीने म्हणाला, “ही सगळी तुमची जुनीच खुसपटं आहेत. त्यात विशेष काय आहे? तरंगरूप वस्तू स्थितीरूपात येऊ शकते, हेच महत्त्वाचे आहे. “
“म्हणजे नेमकं काय होतं?”
“कोणतीही सूक्ष्म वस्तू जेव्हा गतीत नसते, हालत नसते, तेव्हा तिला स्थितीरूप म्हणायचं.”
मामा बावळटासारखा चेहरा करून म्हणाले, “पण मी तर कुठंतरी वाचलंय, की जगात गतीत नसलेली वस्तू अस्तित्वामध्येच नाही. ऑल मॅटर इज इन कॉंन्स्टंट मोशन. “

सापळा वसंताच्या लक्षात आला. तो उसळून म्हणाला, “म्हणजे तुम्ही मला शब्दात पकडायला पाहाता. सगळ्याच वस्तू गतीत असतात. म्हणून सगळ्याच वस्तू तरंगरूप आहेत आणि म्हणून सिध्द होण्याजोगे जड किंवा स्थिर काही नाहीच, असं विधान तुम्ही माझ्या गळ्यात बांधणार आहात. “
“छे! छे! मी कशाला तुझ्या गळ्यात बांधू? तो मान तुझ्या बायकोचा. पण मला गरीबाला झालेला एवढा वस्तूपणाचा घोटाळा दूर कर म्हणजे झालं.”
“विज्ञान नम्र आहे, अभ्यासशील आहे, सत्यशोधक आहे. ते काचेच्या घरात राहून दगडफेक करीत नाही. स्वत:चा अभ्यास पुढे मांडतं, आणि इतरांची अभ्यासाक्षेत्रं चालू ठेवतं. तू विज्ञानला ब्रह्म समज, त्याची माया धरू नकोस. “

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView