मंत्रशास्त्र

Date: 
Sun, 9 Nov 2014

मंत्रशास्त्र म्हणते की, प्रत्येक मंत्रशक्ती सुरक्षित ठेवायची असेल, तर मंत्रारंभी आणि नंतर ओंकारघोष आवश्यक आहे. अक्षरमालिकोपनिषदात ‘अ’ला सर्वगत आणि ‘य’ ला मोहनकारांनी म्हटले आहे. श्रीशंकराचार्यकृ त मंत्रशास्त्र पान 255वर म्हटले आहे की, ओंकारबीज वर्तुळाकार आहे, सर्व मंत्रांपूर्वी त्याचा उच्चार व्हावा लागतो. मंत्रविद्या या बीजापासून उत्पन्न झाली व सर्व मातृका प्रणवापासून उत्पन्न झाल्या.
ओम प्राचीन आहे एवढेच ऐश्वर्य नाही. ओमची महानता विश्वव्यापी आहे असे संशोधनात दिसले. त्याचे 125पुरावे क्रमश; द्यावयाचे आहेत.

पाश्चिमात्य प्रयोग
अमेरिकेत अ, उ, म या ओममधील घटकांचा महात्म्य आज विसाव्या शतकात लॅसॅरियाच्या प्रयोगामुळे पटले.
ओम पैकी ‘अ’ने कंठ व श्वासनलिका; ‘उ’ने यकृत; ‘म’ ने मेंदू शुध्द होतो. ओमचे महत्त्व जैन, शीख, बौध्दांना सारखेच आहे. हिंदूंचा तो मूलाधार आहे. वेद व उपनिषदांपासून तुकाराम महाराजांपर्यंत अनेक पूर्वश्रेष्ठींपासून संतश्रेष्ठांनी ओमचे महत्त्व सांगितले. आता भक्तीला ज्ञानाची जोड मिळाली की, श्रध्दा बळकट होणारच. ओमची अधिक माहिती “प्रार्थना विज्ञान कोश” पैकी एकतिसाव्या प्रश्र्नात आहे. निर्णयात्मक माहिती वर दिलीच आहे.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView