मामा कोण बनला?

Date: 
Sun, 20 Nov 2011

वसंत चांगलाच रागावला होता.
आणि कोणावर? तर समोरच्या मामांवर. आणि कशाासाठक्ष? तर भगवान विष्णुंनी वृंदाला फसवले म्हणून. मामांना जुन्या परंपरेचा अभिमान, हा मामांचा अपराध. तेव्हा मामांाना वसंत संतापाने तळहातावर दुसरी मूठ आपटून म्हणायला लागला, “नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या बायकोला फसवणारा हा कसला तुमचा विष्णु देव? “
तसं, वसंताला आपलं म्हणणं अगदी रास्त आहे, असं वाटत होतं. इंद्र एकदा शंकराच्या भेटीला गेला. तिथं एका ध्यानस्थाला त्यानं शंकराकडे जायचा रस्ता विचारला. पण काहीच उत्तर आलं नाही, तेव्हा इंद्राने सरळ त्या ध्यानस्थाच्या डोक्यात हाणलं आपलं वज्र. तो ध्यानस्थ महात्मा खुद्द शंकरच होता. त्याच्या डोक्यातून ज्वाला निघाली आणि त्या ज्वालेतून तयार झाला ‘जालंधर’ राक्षस. त्या राक्षसाने अखेर इंद्राला त्राही भगवान करून टाकलं. पण जालंधराची भार्या ही विष्णुभक्त असल्यानं, जालंधर अमर राहिला. अर्थात् शंकरालाही काही करता येईना. मग विष्णूनं जालंधराचं रुप घेतलं. तेव्हा वृंदा आपल्या पूजाध्यान सोडून पुढे धावली. जालंधराचं पुण्य विचलित झाल्यावर शंकरानं जालंधराला ठार मारलं. त्याच्याबरोबर वृंदा सती गेली, आणि त्या जागेतून तुळशीचं रोप उगवलं. पुढे विष्णुनं ते पूजनीय स्थान बनवलं. हे सगळं वृंदामहात्म्य
, तुलशीमहात्म्य, वसंताला मुळीच पटलं नाही, विष्णुनं वृंदेवर अन्याय केला, अशी ठाम भूमिका घेऊन तो मामांच्या पुढे उभा राहिला.
जणु काही मामाच विष्णु होते, अशा रागानं वसंत त्यांच्याकडे पहात होता.
मामांनी विचारलं, “पहिला मुद्दा असा पहा. जालंधर मेला नसता, तर चांगल्या लोकांची हत्या होत राहिली असती ते बरं झालं असतं का? “
“नाही पण-“
मामा हसून म्हणाले, “पण असू दे. दुसरा मुद्दा असा. विष्णुनं वृंदेला हात तरी लावला का? तिचं पाविव्रत्य बिघडवलं का “
“नाही पण-“
वसंताचा पण तोडून मामा पुन्हा म्हणाले, “तिसरा मुद्दा पहा. जालंधर मेल्यामुळे
अनेक सज्जन
हत्यांचं वृंदेला लागणारं पाप टळलं व विष्णुच्या कौतुकामुळे ती अमर झाली. ती एरवी मेली असती तर कोणाला तिचं नावही ठाऊक झालं नसतं. “
पण वसंता जोराजोरात हातवारे करून म्हणाला, “पण शंकरानं तरी सत्याचा खून केलाच की? “
मामा मान डोलावीत म्हणाले, “शंकर बोलूनचालून मरण्याचेच देव. आणि वेड्या, जालंधर हा शंकराचाच एक शक्ती भाग नव्हता का? इंद्राच्या मूर्ख रागाला त्यानं प्रति राग निर्माण करून शिक्षा दिली, व आपलं रूप आपल्यात परत घेतलं. “
बिचारा वसंता चार मुद्‌द्यात चारी मुंड्या चीत झाला.

1ST INTERNATIONAL CONFERENCE ON PRENATAL DEVELOPMENT IN INDIA

View Catelogue.jpgView